शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Emotional Story: "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे रे!" चिमुकलीचे देवाला साकडं; काळजाला भिडणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:53 IST

Emotional Story: अलिगडमधील ९ वर्षांच्या या चिमुकलीने खांद्यावर कावड उचलली, ती कोणत्याही हट्टासाठी नाही तर आपल्या उद्ध्वस्त होणाऱ्या घराला वाचवण्यासाठी. दिल्लीहून अलिगडला आपल्या आजी-आजोबांकडे आलेल्या या मुलीने महादेवाच्या मंदिरात एकच आर्त साकडे घातले.

लहान मुलांना सणासुदीला खेळणी, नवीन कपडे किंवा मोबाईल हवा असतो. पण अलिगडच्या गंभीरपुरा परिसरात एका ९ वर्षांच्या चिमुकलीने देवाकडे जे मागितले, ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आपल्या वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे आणि घरात रोज होणारी भांडणे थांबावीत, या एकाच आर्त इच्छेपोटी या चिमुकलीने खांद्यावर कावड घेऊन महादेवाच्या मंदिरात हजेरी लावली.

मूळची दिल्लीची असलेली ही मुलगी अलिगडला आपल्या आजी-आजोबांकडे आली आहे. तिचे वडील दारूच्या आहारी गेल्यामुळे घरात रोज वाद आणि मारामारी होते. या घरगुती कलहाचा तिच्या कोवळ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. वडिलांच्या व्यसनामुळे वैतागलेल्या या मुलीने श्रावणाच्या पवित्र महिन्यात तिने कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. कावड घेऊन मंदिरात पोहोचलेल्या या चिमुकलीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने हात जोडून प्रार्थना केली की, "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे, ते दारू पिऊन आल्यावर घरात खूप भांडतात. मला शांतता हवी आहे." तिच्या या निष्पाप प्रार्थनेने मंदिरातील भाविकही स्तब्ध झाले. तिला पूर्ण विश्वास आहे की महादेव तिचे नक्की ऐकेल आणि तिचे वडील दारू सोडतील.

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, हे आपण अनेकदा पाहिले किंवा वाचले वाचतो. परंतु, या चिमुकलीनं उचललेली कावड ही त्या वेदनेचे जिवंत उदाहरण ठरले आहे. थकलेल्या चेहऱ्यावर आशेचा किरण घेऊन चालणाऱ्या या मुलीची ही यात्रा केवळ धार्मिक नसून, ती व्यसनाधीनतेच्या विरोधात एका लहान मुलाने दिलेला मोठा संदेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Little Girl's Prayer: 'Mahadev, Make My Father Quit Alcohol!'

Web Summary : A nine-year-old girl from Aligarh, burdened by her father's alcoholism and domestic disputes, undertook a pilgrimage carrying a 'kawad'. She prayed to Lord Mahadev to end her father's addiction and bring peace to her family, moving devotees with her innocent plea.
टॅग्स :aligarh-pcअलीगढ