शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

video : जेसीबीनं खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचवलं, बाहेर आल्यानंतर त्यानं जे केलं ते पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:56 IST

elephant rescue operation video : कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे आणि यामुळे नकळत एक हत्ती मोठ्या खड्ड्यात पडला. 

ठळक मुद्देहा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर चार हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

हत्ती जगातील सर्वात समजूतदार प्राणी आहे. याशिवाय, त्याच्या वजनाबद्दलही उत्सुकतेची बाब आहे. अशा परिस्थितीत ज्यावेळी एक हत्ती खड्ड्यात पडला, त्यावेळी जेसीबीच्या मदतीने त्याला कसे बाहेर काढले गेले. यासंबंधीचा बचाव व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील घटना कर्नाटकातील आहे. हत्तीला कसे वाचविले, याबाबत लोक सोशल मीडियावर प्रशासनाचे कौतुक करत आहेत. (elephant rescue operation video in coorg,karanataka;went viral on social media)

भारतीय वन सेवेमध्ये काम करणार्‍या सुधा रमणने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओचे क्रेडिट सतीश शहा यांना देण्यात आले आहे. कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे आणि यामुळे नकळत एक हत्ती मोठ्या खड्ड्यात पडला. 

या हत्तीने खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, खड्ड्यातून बाहेर येण्यास तो अयशस्वी झाला. त्यानंतर येथील वनविभाग आणि प्रशासनाने या हत्तीला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली. जेसीबीच्या मदतीने हत्तीला बाहेर काढण्यात आले. यावेळी हत्ती स्वतःच सतत प्रयत्न करत असल्याने आणि त्याला बाहेर काढण्यात खूप मदत झाली.

या व्हिडिओमध्ये, खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर घाबरलेला हत्ती जेसीबी बरोबर दोन हात करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहे. मात्र, परंतु जेसीबी चालकाने त्याला जंगलाकडे जाणारा रस्ता दाखविला जेणेकरून तो सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने जाईल. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर चार हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलKarnatakकर्नाटक