शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रस्त्यात थांबून हत्तीने पाणीपुरीवर मारला ताव, लोक म्हणाले - 'ही नक्कीच हत्तीण असेल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:07 IST

Elephant eating panipuri : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका पाणीपुरीच्या गाडीजवळ थेट हत्ती पोहोचला.

Elephant eating panipuri : स्ट्रीट फूड खाण्याची क्रेझ भारतीय लोकांसारखी आणखी कुठे बघायला मिळत नाही. भारतात खासकरून पाणीपुरीची क्रेझ सगळ्यांनाच माहीत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रोज पाणीपुरीचं आनंद घेतात. फार क्वचित कुणी असं असेल ज्याला पाणीपुरी आवडत नाही. पाणीपुरी लोकांमध्ये तर फेमस आहेच, सोबतच प्राण्यांनाही याची टेस्ट आवडते.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका पाणीपुरीच्या गाडीजवळ थेट हत्ती पोहोचला. इतकंच नाही तर हत्ती एकापाठी एक पाणीपुरी सोंडेच्या मदतीने खात आहे. हा नजारा पाहून आजूबाजूला लोकांची गर्दी झाली आहे. हत्तीला आवडीने पाणीपुरी खाताना पाहून लोकही अवाक् झाले आहेत. पाणीपुरी विकणारी व्यक्तीही हत्तीला एकपाठी एक पाणीपुरी देत आहे.

हा अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. हत्तीवर एक व्यक्तीही बसलेली दिसत आहे. हत्ती ज्याप्रमाणे पाणीपुरीचा आनंद घेत आहे ते पाहून तर हेच वाटतं की, हा हत्ती रोज इथे पाणीपुरी खाण्यासाठी येत असेल. 

केवळ एका दिवसात या व्हिडिओला ७५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने गमतीने लिहिलं की, 'हा हत्ती नसेल नक्कीच हत्तीण असेल'.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके