शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळं झालेलं स्विच बोर्ड काही मिनिटात पुन्हा चमकेल, जाणून घ्या सोप्या टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 10:39 IST

Switch board cleaning tips : जास्त दिवस स्विच बोर्ड स्वच्छ न केल्याने त्यावर खूप धूळ-माती बसते आणि ते काळे दिसू लागतात.

Switch board cleaning tips : बऱ्याच लोकांना नेहमीच घराची साफ सफाई करणं आवडत असतं. लोक घरातील एक एक वस्तू स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. फॅन, लाईट, टेबल, टीव्ही, पॉट्स, आरसे सगळे स्वच्छ केले जातात. पण अनेकदा घरातील स्विच बोर्ड स्वच्छ करण्याकडे फारचं कुणी लक्ष देत नाहीत. अशात जास्त दिवस स्विच बोर्ड स्वच्छ न केल्याने त्यावर खूप धूळ-माती बसते आणि ते काळे दिसू लागतात.

स्विच बोर्डवर धूळ-माती इतकी घट्ट चिकटून जाते की, ती काढण्यासाठी खूप वेळ लागतो. अनेकांना हे स्विच बोर्ड कसे स्वच्छ करावे, त्यावरील घाण कशी काढावी हे माहीतच नसतं. आज अशा लोकांना आम्ही काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील स्विच बोर्ड चमकवू शकता.

टूथपेस्टने करा स्वच्छ

स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. एका भांड्यात ३ ते ४ चमचे नॉर्मल टूथपेस्ट घ्या आणि त्यात २ चमचे बेकिंग सोडा, काही पाण्याचे थेंब टाकून चांगलं मिक्स करा. ही पेस्ट स्विच बोर्डवर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर टूथ टूथब्रश किंवा क्लीनिंग ब्रशने स्विच बोर्ड स्वच्छ करा. नंतर एका कापडाने पुसून घ्या.

नेलपेंट रिमूवर

नेलपेंट रिमूवर स्विच बोर्डवरील काळे डाग काढण्यासाठी बेस्ट उपाय आहे.  हे लिक्विड कापसाच्या बोळ्याला लावून स्विच बोर्ड साफ करू शकता. एकदा वापरूनच तुम्हाला स्विच बोर्ड साफ दिसेल. दुसऱ्यांदा स्वच्छ कराल तर स्विच बोर्ड क्लिन होईल.

बेकिंग सोडा 

काळं झालेलं स्विच बोर्ड चमकदार करण्यासाठी बेकिंग सोडाही वापरू शकता. एक कप पाण्यात बेकिंग सोडा टाका. यात थोडा लिंबाचा रसही टाका. मग एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर हे पाणी लावा. पाच मिनिटांनंतर त्याच ब्रश बोर्ड घासा. नंतर कापडाने स्विच बोर्ड पुसून घ्या.

लिंबू आणि काळं मीठ

लिंबू आणि काळ्या मिठाने स्विच बोर्डची चांगली सफाई होऊ शकते. यासाठी लिंबाचे दोन भाग करा. ते काळ्यात मिठात डिप करा. नंतर स्विच बोर्डवर घासा. त्यानंतर २ मिनिटांसाठी ते तसंच राहू द्या. त्यानंतर एका ब्रशने बोर्ड साफ करा. नंतर एका कापडाने बोर्ड पुसून घ्या.

काय घ्याल काळजी

घरातील स्विच बोर्ड स्वच्छ करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. क्लीनिंगआधी घरातील मेन स्विच ऑफ करा. घरातील इतरांनीही मेन स्विच ऑफ असल्याचं सांगा. जर चुकूनही स्विच बोर्डमध्ये किंवा बटनांमध्ये पाणी गेलं तर शॉक लागू शकतो. स्विच बोर्ड साफ करताना पायाच चप्पल घाला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके