शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चुकूनही विमान प्रवासात हे पिऊ नका...; एअर होस्टेसचा अनुभव, प्रवाशांना केलं सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:53 IST

तिने वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपनीसोबत ६ वर्षाहून अधिक काळ काम केले आहे.

विमान प्रवास करणं हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते, काहींना ते जमते तर काहींना जमत नाही. विमान प्रवासाबाबत अनेकांनाच उत्सुकता असते. त्यातच एअर होस्टेस म्हणून काम केलेल्या डिजिटल क्रिएटर कॅट कमलानी हिने तिचा विमानात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यात विमान प्रवासावेळी कुठलेही पेय पिण्यापासून टाळावं असा सल्ला तिने दिला आहे. कॅटने तिच्या इन्स्टाग्राम रिलवर फोलोअर्सला नेहमी फ्लाईटमध्ये बॉटेल किंवा कॅनमधूनच पाणी प्यावं. विमानात कधीही द्रवपदार्थ सेवन करू नका असं सांगत माजी फ्लाईट अटेंडंटने दिलेले कारण खूपच धक्कादायक आहे.

कॅट ही २ मुलांची आई आहे. त्यासोबत ती कन्टेंट क्रिएटर म्हणूनही काम करते. तिने वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपनीसोबत ६ वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. या काळात तिला आलेले अनुभव तिने सोशल मीडियावरील चाहत्यांसाठी सांगितले आहे. त्यात फ्लाईटमधील पाण्याची टाकी कदाचितच साफ केली जाते, ती खूप घाण असते. हेच पाणी कॉफी अथवा चहा बनवण्यासाठी वापरले जाते त्यामुळे आरोग्यावरही  परिणाम होऊ शकतो असं रिलमध्ये सांगितले आहे. 

कॅटने विमानात वापरल्या जाणाऱ्या कॉफी मशिनकडे इशारा करत ही मशीन तोपर्यंत व्यवस्थित साफ केली जात नाही जोपर्यंत ती खराब होत नाही. उड्डाणावेळी मशीनमधील पॉट बदलले जातात परंतु पूर्ण मशीन योग्यरित्या साफ होत नाही. त्याचसोबत पाण्याची मशीन बहुतेकदा विमानाच्या टॉयलेटजवळ असते. ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो असंही कॅटने तिच्या रिल्समध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, कॅटने लहान मुलांच्या पालकांनाही सल्ला दिला आहे. जे आई वडील मुलांसाठी बॉटेलमध्ये दूध बनवू इच्छितात त्यांनी कधीही गरम पाणी मागवून बॉटेलमध्ये टाकू नये. त्याऐवजी बॉटलबंद पाणी किंवा वेगळे गरम पाण्याचा कप घ्याल. बॉटेल बंद पाण्याला गरम पाण्याच्या कपात टाकून लहान मुलांसाठी दूध तयार करा असं कॅटने सांगितले. मागील वर्षी अशाच एका एअर होस्टेसने फ्लाईटमध्ये वापरले जाणारे हॉट वॉटर पॉट्स कदाचितच पूर्णपणे साफ केले जातात. फ्लाईटमध्ये केवळ थंड पाण्याचे सेवन करा, एअरपोर्टवर बोर्डिंग करण्याआधी एखाद्या वेंडरकडून गरम पाणी भरून घ्या असं सांगितले होते.  

टॅग्स :airplaneविमान