शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉलवर मोमोज विकून दिवसाला किती कमाई होते? मालकाने दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:25 IST

Viral Video : एक दिवस रस्त्याच्या कडेला त्याने मोमोजचा स्टॉल लावण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने दिवसभराच्या कमाईचा खुलासा केला. 

Viral Video : मोमोज खाणं आजकाल बऱ्याच लोकांना आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने मोमोज बाजारात मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी मोमोजची किंमतही वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, मोमोज विकून किती कमाई केली जात असेल? याचाच खुलासा इन्फ्लुएन्सर सार्थक सचदेवाने केला आहे. एक दिवस रस्त्याच्या कडेला त्याने मोमोजचा स्टॉल लावण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने दिवसभराच्या कमाईचा खुलासा केला. 

इन्स्टाग्रामवर शेअर या व्हिडिओला आतापर्यंत २.३ कोटी वेळा बघण्यात आलं आहे. सचदेवाने मोमोज विकणाऱ्याचा वेश धारण केला. तो हळूहळू गर्दीच्या ठिकाणी गेला. सगळ्यात आधी सार्थकने मोमोज बनवण्याचे बेसिक शिकले, त्यानंतर त्याला एकापाठी एक ऑर्डर आल्या.

सार्थकनुसार, त्याने स्टीम्ड मोमोज ६० रूपये प्लेट आणि तंदुरी मोमोज ८० रूपये प्लेटने विकले. व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की, पहिल्या ९० मिनिटांमध्ये साधारण ५५ प्लेट मोमोज विकले गेले होते. सायंकाळ झाली तर लाईन संपेना. नंतर चार तासांमध्ये त्याने साधारण १२१ प्लेट स्टीम्ड आणि ६० ते ७० प्लेट तंदुरी मोमोज विकले.

स्टॉलची कमाई आणि खर्चाबाबत समजून घेण्यासाठी सार्थक मालकासोबत बोलला. मालकानुसार, साधारण ६ हजार ते ७ हजार रूपयांच्या खर्चानंतर दिवसाची शुद्ध कमाई ७ हजार ५०० ते ८ हजार रूपये होते. सचदेवाने अंदाज लावला की,स्टॉल महिन्यातून साधारण २.४ लाख रूपये आणि वर्षाला साधारण ३० लाख रूपये कमाई करतो.

सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. मोमोजमधून होणाऱ्या कमाईबाबत वाचून लोक अवाक् झाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी मी मोमोजचा स्टॉल लावायला पाहिजे होता. आज मला दिल्लीत भाड्याच्या घरात रहावं लागलं नसतं".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके