शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

ट्रकला वाचवताना हवेत उडाली क्रेन अन् नंतर जे झालं ते पाहुन होईल तुमचा थरकाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2022 18:27 IST

क्रेनने ट्रकला उचलताच ती हवेत उडाली आणि ट्रकसोबत क्रेनही पाण्यात कोसळली. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे (Crane fall down into river while lifting truck).

काही वेळा एखाद्याला संकटातून वाचवणारा स्वतःच संकटात सापडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक क्रेन एका ट्रकला वाचवण्यासाठी गेली. पण क्रेनने ट्रकला उचलताच ती हवेत उडाली आणि ट्रकसोबत क्रेनही पाण्यात कोसळली. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे (Crane fall down into river while lifting truck).

ट्रक, बस यासारख्या अवजड वाहनांचा अपघात झाला. या गाड्या एखाद्या ठिकाणी कोसळल्या की त्यांना वाचवण्यासाठी क्रेनची मदत घेतली जाते. अशाच एका ट्रकचा अपघात झाला. अनियंत्रित होऊन ट्रक पुलावरून नदीत कोसळला. या ट्रकला नदीतून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन मागवण्यात आल्या. पण एका क्रेनचा या ट्रकला वाचवता वाचवताच अपघात झाला.

व्हिडीओत पाहू शकता क्रेनची केबल पाण्यात पडलेल्या ट्रकला जोडून ट्रक पाण्यातून बाहेर काढला जात होता. उंच पुलावर असलेली क्रेन खोल असलेल्या पाण्यातून ट्रकला वर खेचत होती. त्याचवेळी क्रेनची केबल तुटली आणि ट्रक पुन्हा पाण्यात कोसळला. ट्रक पुन्हा पाण्यात गेलाच पण त्याचवेळी त्याला वर खेचणारी क्रेनही हवेत उडाली. क्रेनची मागील दोन्ही चाकं वर झाली आणि क्रेन हवेत उडत थेट त्याच पाण्यात कोसळली ज्या पाण्यात ट्रक कोसळला होता. व्हिडीओत दुर्घटना पाहूनच आपल्याला धडकी भरते.

ज्यावेळी क्रेन पाण्यात कोसळली तेव्हा क्रेन ऑपरेटरही त्यात होता. त्याला वाचवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत होते. पण क्रेन पाण्यात पडताच तो क्रेनमधून लगेच बाहेर पडला. सुदैवाने त्याला पोहोता येत होतं, म्हणून तो स्वतःच पोहोत पाण्यातून बाहेर आला.  त्याला गंभीर दुखापत झाली पण पोहोता येत असल्याने त्याचा जीव वाचला.

essence world युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना ओडिशाच्या तालचेर शहरातील असल्याचं सांगितलं जातं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब