शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Corona Vaccine : "तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको", कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 20:47 IST

Corona Vaccine Doctor Explains 'How To Get Vaccine And Not The Virus' In Video : लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. याच दरम्यान मुंबईतील एका डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. याच दरम्यान मुंबईतील एका डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आहे. 

"तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको" असं सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना लसीकरणासाठी जाण्याआधी हा Video नक्की पाहा कारण डॉक्टरांनी यामध्ये मोलाचा सल्ला दिला आहे. मुंबईतील एका डॉक्टरांनी कोरोना व्हायरसबाबत जनजागृती केली आहे. तुषार शहा असं या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी आपला एक व्हिडीओ शेअर करून लोकांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. Zucker Doctor या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर तुषार यांनी आपल्या हातात काही  पोस्टर्स घेतले आहेत. 

पोस्टर्समधून त्यांनी कोरोना काळात महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पहिल्या पोस्टरवर "लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आपल्याला लस देतात". दुसऱ्या पोस्टरवर "लसीकरण केंद्रावरची गर्दी आपल्याला कोरोना व्हायरस देते" असं म्हटलं आहे. त्यानंतरच्या पोस्टर्सवर "तुम्ही फक्त लस घ्या पण त्या व्हायरसने बाधित होऊ नका, तुम्ही हे कसं कराल?" असं म्हटलं आहे. डॉक्टरांनी आपल्या काही पोस्टर्सवर लसीकरण केंद्रावर कोरोनापासून आपला बचाव कसा करावा, याबाबत सल्ला दिला आहे. यात काय करावं, काय करू नये हे सांगण्यात आले आहे. 

"तोंडावर दोन मास्क लावा. आतमध्ये  N95 आणि बाहेर सर्जिकल मास्क. हातमोजे वापरा. तसंच तोंडाला हात लावणं, हस्तांदोलन करणं टाळा. हातमोजे घातलेल्या हातांनाही सॅनिटायझर लावा आणि कोणाशीही अजिबात बोलू नका" अशा सूचना पोस्टर्समधून देण्यात आल्या आहेत. तसेच "लसीकरणाला जाण्यापूर्वी शरीरात पाणी असू द्या त्यामुळे तिथं जाण्याआधी चहा किंवा कॉफी घेऊन जा. तसेच लसीकरणाच्या रांगेत उभं राहून अन्नपदार्थ खाणं, पाणी पिणं हे सगळं टाळा तुम्ही जर लसीकरण केल्याचा फोटो काढत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू नका" असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

परिस्थिती भीषण! "इतकं हतबल, लाचार कधीच वाटलं नाही..."; कोरोनाचं धक्कादायक वास्तव सांगताना डॉक्टरला कोसळलं रडू

कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती सांगताना मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरही भावूक झाल्या आहेत. मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ तृप्ती गिलाडा (Dr. Trupti Gilada) यांनी कोरोनाची भयंकर परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. कोरोनाचं संकट, रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे. लोकांनी काय करायला हवं यावर डॉ. तृप्ती गिलाडा यांनी व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही असं म्हटलं आहे. 

"मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार झाल्यासारखं कधीच वाटलं नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण असं काही नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं काही नाही. त्यामुळे काळजी घ्या" असं डॉ. तृप्ती यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतdoctorडॉक्टर