कोरोना व्हायरसमुळे सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात अनेक ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत. सर्वाधिक चर्चा मासांहार केल्याने कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होतो की नाही. अशा प्रकारच्या आहेत. कारण कोणताही आजार आल्यानंतर मासांहाराचे सेवन लोक घाबरून खूप कमी करतात. अशात उत्पादकांचे आणि व्यावसाईकांचे विनाकारण खूप नुकसान होते. अशात एक व्हिडीयो समोर आला आहे.
अनेकांनी चिकन खाणं कमी केलं आहे. चिकन खाणं सोडून सुद्धा दिलं आहे. त्यामुळे विक्री मोठया प्रमाणावर घरसली आहे. विक्रे्त्यांना अत्यंत कमी पैशात कोंबड्यांची विक्री करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आता कोरोना व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी हजारो कोंबड्या जिवंत गाडल्या आहेत.
कर्नाटकच्या बेळगाव आणि कोलार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कोंबड्या जिवंत गाडल्यात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेळगावच्या लोसुर गावातील शेतकरी नाझीर मकंदर यांनी तब्बल 6 हजार ५०० कोंबड्यांना जिवंत गाडलं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की ट्रकभर या कोंबड्या आणल्या आणि खड्ड्यात त्यांना टाकलं गेलं. कोलारमधील मंगोडी गावातही अशीच घटना घडली आहे, तिथल्या एका शेतकऱ्याने 9,500 कोंबड्या जिवंत गाडल्यात, असं वृत्त Deccan Herald ने दिलं आहे.कोरोनाव्हायरसच्या भीतीनं लोकं मासांहार करत नाहीत, कोंबड्या घेत नाहीत. त्यामुळे कोंबड्यांचे दर कमी करण्यात आलेत. यातून कुक्कुटपालनाचा खर्चही मिळत नाही आहे, शिवाय कोंबड्यांना खाद्य पुरवून त्यांना जगवणंही अशक्य झालं आहे. त्यामुळे ज्या हातांनी या कोंबड्यांना जगवलं, त्याच हातांनी त्यांना जिवंत गाडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.