शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना से डर नहीं लगता साहब, पंखे से लगता है! रुग्णाचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 09:00 IST

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला वाटतेय रुग्णालयातील पंख्याची भीती

छिंदवाडा: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती विदारक आहे. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा रुग्णालयातही असाच एक प्रकार घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं त्याची समस्या व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. या व्हिडीओत तरुण रुग्ण वॉर्डमध्ये असलेल्या एका पंख्याची तक्रार करताना दिसत आहे. कोरोना से डर नहीं लगता साहब, फॅन से लगता है, अशी दबंग स्टाईल तक्रार या तरुणानं व्हिडीओमध्ये केली आहे. या तरुणाच्या डोक्यावर असलेला पंखा एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा लवकरात लवकर बदलण्यात यावा, अशी मागणी या रुग्णानं केली आहे. रुग्णानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ २ मिनिटं १८ सेकंदांचा आहे. यामध्ये रुग्णांनी भरलेला वॉर्ड दिसत आहे. त्यानंतर तरुणानं व्हिडीओमध्ये त्याच्या डोक्यावर असलेला पंखा दाखवला आहे. हा पंखा एका जागी न राहता तो एखाद्या भोवऱ्यासारखा फिरताना दिसत आहे. हा पंखा कधीही खाली पडेल अशा स्थितीत आहे. कोरोनाची भीती नंतर, मला त्याआधी या पंख्याची भीती वाटते. कोरोनाच्या आधी हा पंखाच माझा जीव घेईल, असं वाटतं, अशी व्यथा या तरुणानं मांडली आहे.'मित्रांनो, हा मी आहे. मी छिंदवाडा जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात ऍडमिट आहे आणि हा माझ्या डोक्यावरील पंखा आहे, ज्याला पाहून मला भीती वाटते,' असं तरुणानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. एक तर पंखा बदला किंवा माझी जागा बदला, मला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा, अशी विनंती मी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे केली. पण काहीच उपयोग झाला नाही, अशी तक्रार या रुग्णाची आहे. 'मित्रांनो, सांगा आपण काय बदलायचं, हा पंखा, हा बेड, या रुग्णालयातील कर्मचारी की सरकार?' असा मिश्किल प्रश्न त्यानं व्हिडीओच्या शेवटी उपस्थित केला आहे.