China Viral News: एकाच वेळी अनेक तरूणांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. चीनच्या शेंजेन भागातील या महिलेनं जरा जास्तच कमाल केली. या महिलेनं एकाच वेळी तब्बल ३६ पुरूषांना फसवलं. महिलेने या पुरूषांसोबत डेटचं नाटक केलं आणि घर खरेदी करण्याचं आमिष दाखवत त्यांना लुटलं. ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही फसवणूक झाली.
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, ३६ पीडितांपैकी एक जो आताओ नावाच्या व्यक्तीनं सांगितलं की, लियू जिया नावाच्या महिलेला तो २०२४ च्या मार्च महिन्यात भेटला होता. नंतर तो तिच्या प्रेमात पडला. तो म्हणाला की, "ती सुंदर आणि संस्कारी मुलगी वाटली. मला वाटलं ही परफेक्ट गर्लफ्रेन्ड आहे". महिलेने त्याला सांगितलं होतं की, ती ३० वर्षांची आहे आणि हुनान प्रांतातील आहे. ती शेंजेनमध्ये एका ई-कॉमर्स कंपनीत काम करते, दोघांनी १ महिना डेटिंगनंतर लग्नाचा निर्णय घेतला.
अताओनं सांगितलं की, लियू त्याच्यासोबत लग्न करून घर खरेदी करण्याबाबत बोलली होती. यासाठी ती स्वत:ही काही पैसे देणार असल्याचं म्हणाली होती. तर डाउन पेमेंट अताओला करण्यास सांगितलं होतं. हे घर तिच्याच नावावर घेण्याचं ठरलं. घराची खरेदी पूर्ण झाली. त्यानं लियूनं त्याच्यासोबत बोलणं बंद केलं.
तसेच वांग नावाच्या दुसऱ्या पीडित व्यक्तीनं सांगितलं की, घर खरेदी करण्यासाठी लियूनं त्याच्यासोबत बोलणं सोडलं. अताओचं मत आहे की, लियूनं शेंजेनमधील साधारण ३० वयाच्या ३६ पुरूषांना फसवलं. सगळ्यांनी तिला १ ते २ महिने डेट केलं.
सोशल मीडियावर या महिलेच्या कारनाम्याची चांगलीच चर्चा होत आहे. लोक तिला खूप चलाख महिला असल्याचं म्हटले. एका यूजरनं गमतीनं कमेंट केली की, "ही महिला रिअल इस्टेट डेव्हलपरसाठी सेल्स चॅम्पियन व्हायला हवी". तर एकानं लिहिलं की, "हे पुरूष फारच बेजबाबदार आहेत".