शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जुन्या फोनमधून २० मिनिटांत काढलं सोनं, पाहा वैज्ञानिकांनी कसा केला हा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:40 IST

Gold From Phone : जरी एका मोबाईल किंवा एका रिमोटमधून मिळणारं सोनं फार जास्त नसलं, तरी इतक्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं सोनं काढणं ही खरोखर मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे.

Gold From Phone : आपण वापरत असलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सोनं वापरलं जातं, हे तुम्हाला माहीत असेलच. मोबाईल फोन, रिमोट कंट्रोल, टीव्ही, कॉम्प्युटर यांसारखी उपकरणं जुनी झाली की आपण ती फेकून देतो आणि ती ई-वेस्ट बनतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी या ई-वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी एक अत्यंत चमत्कारी आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ई-वेस्टमधून सोनं काढता येतं. जरी एका मोबाईल किंवा एका रिमोटमधून मिळणारं सोनं फार जास्त नसलं, तरी इतक्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं सोनं काढणं ही खरोखर मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे.

चीनच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी

चीनमधील चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत येणाऱ्या ग्वांगझोउ इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी कन्वर्जन आणि साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी ही खास पद्धत शोधली आहे. संशोधनानुसार, ही प्रक्रिया सामान्य खोलीच्या तापमानावर अवघ्या 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सोनं वेगळं करू शकते. विशेष म्हणजे, ही पद्धत सध्याच्या सोने पुनर्प्राप्ती तंत्रज्ञानाच्या तुलनेत सुमारे एक-तृतीयांश खर्चात पूर्ण होते. त्यामुळे ती आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त तंत्रज्ञानांपैकी एक मानली जात आहे.

रिमोट आणि मोबाईलमधून 20 मिनिटांत सोनं

अनेक टेस्टमध्ये आढळून आले आहे की, जुन्या मोबाईल फोनच्या CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि घरगुती उपकरणांच्या PCB म्हणजेच प्रिंटेड सर्किट बोर्डमधून 98.2 टक्क्यांहून अधिक सोनं यशस्वीपणे काढण्यात आलं. सध्या ई-वेस्ट हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या घनकचऱ्यांपैकी एक आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये सोनं काढण्यासाठी सायनाइडसारख्या अत्यंत विषारी रसायनांचा वापर केला जातो, जो पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. याच समस्येवर उपाय म्हणून चीनमधील शास्त्रज्ञांनी ही नवीन पद्धत विकसित केली आहे, जी सेल्फ-कॅटलिटिक लीचिंग मेकॅनिझमवर आधारित आहे.

प्रक्रिया कशी सोपी झाली?

या नव्या प्रक्रियेत फक्त पोटॅशियम पेरॉक्सिमोनोसल्फेट आणि पोटॅशियम क्लोराइड यांच्या साध्या पाण्यातील द्रावणाचा वापर केला जातो. हे द्रावण जेव्हा सोनं किंवा पॅलेडियमच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतं, तेव्हा धातू स्वतःच उत्प्रेरक म्हणून काम करू लागतं. या प्रक्रियेदरम्यान सिंगलेट ऑक्सिजन आणि हायपोक्लोरस अ‍ॅसिडसारखे अत्यंत प्रतिक्रियाशील ऑक्सिडंट्स तयार होतात. हे घटक धातूचे कण तोडून त्यांना द्रावणात विरघळवतात, ज्यामुळे नंतर सोनं सहजपणे वेगळं करता येतं.

संशोधनात असंही आढळलं की, या पद्धतीने 93.4 टक्के पॅलेडियम देखील मिळवता येते. आकडेवारीनुसार, जर 10 किलो जुन्या सर्किट बोर्डावर जर प्रक्रिया केली, तर त्यातून साधारण 1.4 ग्रॅम सोने मिळू शकतं. हे महत्त्वपूर्ण संशोधन जगप्रसिद्ध वैज्ञानिक जर्नल Angewandte Chemie International Edition मध्ये प्रकाशित झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Scientists Extract Gold from Old Phones in 20 Minutes

Web Summary : Chinese scientists developed a method to extract gold from e-waste in 20 minutes using a simple solution, costing a third of current methods. The process recovers over 98% gold from CPUs and PCBs, offering a cheaper, eco-friendly alternative to cyanide-based extraction.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सGoldसोनंSocial Viralसोशल व्हायरल