शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

क्युट वाटतो म्हणून जवळ गेलेल्या व्यक्तीवर चिंपाझीने केला हल्ला, सोडता सोडेना अखेरीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:15 IST

चिम्पांझी आणि माणसातील प्रेम दिसून येतं. पण हे चिम्पांझीही काही वेळा खतरनाक ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येतो.

चिम्पांझीशी संबंधित बऱ्याच फिल्म्स, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात सामान्यपणे चिम्पांझी माणसांना हानी पोहोचवताना दिसत नाही. चिम्पांझी आणि माणसातील प्रेम दिसून येतं. पण हे चिम्पांझीही काही वेळा खतरनाक ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येतो (Chimpanzee Attacked On Man At Zoo).

एका प्राणीसंग्रहायलातील हा धक्कादायक व्हिडीओ आहे. एका संतप्त चिम्पांझीने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. पिंजऱ्यात असतानाही चिम्पांझीने व्यक्तीची अशी अवस्था केली आहे, ही पाहूनच धडकी भरेल. ही व्यक्ती तर यापुढे प्राणीसंग्रहायलात जाण्याची हिंमत करणारच नाही आणि गेली तरी चिम्पांझीसमोर तर कधीच जाणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक चिम्पांझी पिंजऱ्यात आहे. एक व्यक्ती त्याच्यासमोर आपले दोन्ही हात दाखवत येतो. चिम्पांझी अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो. त्याचा टी-शर्ट धरून त्याला खेचतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावते. व्यक्तीला मागून पकडून धरून खेचण्याचा प्रयत्न करते. पण चिम्पांझी त्या व्यक्तीवरील आपली पकड आणखी घट्ट करतो. टी-शर्ट हातातून सुटताच चिम्पांझी त्याचा पाय आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवतो.

व्यक्ती त्या चिम्पांझीच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. दुसरी व्यक्ती त्याला खेचूनही ती त्या चिम्पांझीच्या तावडीतून सुटत नाही. पिंजऱ्यावर ती व्यक्ती आडवीही होते. पण काहीच फायदा होत नाही.

@gieddee इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून धडकी तर भरतेच पण हसूही आवरत नाही. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया