शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सापासोबत खेळणाऱ्या इवल्याश्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरीही पाहुन हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:28 IST

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा सापांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून अनेकजण भडकलेही आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की असं करणं म्हणजे वेडेपणा आहे.

सोशल मीडियाच्या जगात अनेकदा नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील अनेक व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही हैराण होईल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा सापांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून अनेकजण भडकलेही आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की असं करणं म्हणजे वेडेपणा आहे.

हा व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा आई-वडिलांनी आपल्या मुलांना अधिक जबाबदारीने सांभाळायला हवं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून लोक थक्कही झाले आणि भडकलेही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा घरामध्ये उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये एक हिरव्या रंगाचा साप आहे (Kid Playing with Snake).

तुम्ही पाहू शकता की हा साप त्याच्या पाठीवर तसंच डोक्यावर जात आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या मुलाच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. उलट हा मुलगा सापाला हातात घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे. साप म्हणजे एखादं खेळणं असल्याप्रमाणे तो त्याच्यासोबत खेळत राहातो. हे पाहून कोणाच्याही काळजाचे ठोके चुकतील. हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे.

लहान मुलगा आणि सापाचा हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 14 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा वाढतच आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्स भडकले आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की साप एखादं खेळणं नाही, जे तुम्ही मुलांच्या हातात द्याल. आई-वडिलांनी मुलांच्या बाबतीत अधिक जबाबदार व्हायला हवं.

एका यूजरचं असं म्हणणं आहे, की मला वाटतंय हा ग्रीन ट्री बोआ साप आहे. हे साप चावणारे असतात आणि एका मुलाला अशाप्रकारे सापासोबत खेळायला लावणं चुकीचं आहे. तसंही साप खेळायची वस्तू नाही. दुसऱ्या एका यूजरनं या मुलाबाबत काळजी व्यक्त करत लिहिलं, आई-वडिलांनी इतकं बेजबाबदार असू नये. हा साप विषारी नसला तरी मुलाला चावू शकतो. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया