शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर फसवणूक; गाड्यांमध्ये भरलं जातं पाणी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:57 IST

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत.

नालागड(सोलन)- एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशमधल्या सोलन जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या नालागड शहरात एक भयंकर प्रकार उजेडात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये काही जण बोटल घेऊन पेट्रोल पंपावर गेल्याचं पाहायला मिळतंय, त्यानंतर पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी बोटलमध्ये मशीनमधून पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बोटलमध्ये पेट्रोलच्या ऐवजी पाणी भरलं जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे या पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या आडून पाणी तर विकलं जात नाही ना, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. स्थानिकांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोलच्या ऐवजी  मशीनमधून पाणी निघत असल्याची विचारणा केली असता त्यानंही ते मान्य केलं. लोकांनी आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून, पाहता पाहताच तो वाऱ्यासारखा पसरला आहे. सीएम हेल्पलाइनवर स्थानिकांनी या प्रकराची तक्रार दिली. पेट्रोल पंपवाले पूर्ण पैसे घेत असून, पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे गाड्या खराब होत आहेत. अशा पेट्रोल पंप मालकांविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तसेच त्या पेट्रोल पंप चालकांचा परवाना रद्द केला पाहिजे, अशी मागणी तक्रारकर्त्यानं केली आहे.  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप