शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

VIDEO: खचाखच भरलं होतं स्टेडियम, पण मॅच सोडून मांजराच्या 'रेस्क्यू'साठी सरसावले प्रेक्षक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 10:28 IST

Cat At Miami College Football Game Survives Fall : प्रेक्षक स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहत असतात, तेव्हाच लोकांच्या नजरा एका मांजराकडे जातात.

अमेरिकेत (America) हजारो लोक Miami Stadium वर  फुटबॉल सामन्याचा (Football Match) आनंद घेत होते. मात्र, या दरम्यान स्टेडियममध्ये असे काही घडते की लोकांचे लक्ष सामन्यापासून दूर गेले आणि लोक ओरडू लागले. या घटनेचे व्हिडिओ (Videos) देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दिसून येते की, या घटनेमागे एक मांजर (Cat) आहे. (Video shows Florida football fans use a U.S. flag to rescue cat that fell from upper deck)

दरम्यान, प्रेक्षक स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहत असतात, तेव्हाच लोकांच्या नजरा एका मांजराकडे जातात. हे मांजर स्टेडियमच्या छताला लटकलेले होते. तसेच, मांजर कित्येक फूट उंचावरून खाली पडण्याच्या मार्गावर होते. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक सामना सोडून ओरडायला लागतात आणि मांजरला वाचवण्यासाठी शक्कल लढवण्याचा विचार करत होते. 

दुसरीकडे, स्टेडियमच्या छतावर लटकलेल्या मांजरचा तोल हळूहळू सुटत होता. दरम्यान, छतावरील मांजराची पकड सैल होते आणि ते खाली पडते. मात्र, खाली पडताना मांजरला खालच्या मजल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी पकडले. हे मांजर पडण्यापूर्वी लोक अमेरिकन ध्वज घेऊन खाली उभे राहिले. मांजर त्याच ध्वजाच्या मध्यभागी पडले आणि त्यांची सुखरूप सुटका झाली. हे पाहून प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या. 

यूएसए टुडेच्या एका रिपोर्टनुसार, स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मांजरीला तेथून सुरक्षित ठिकाणी नेले आणि सांगितले की, यात मांजराला कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच, क्रेग क्रोमर या प्रेक्षकाने दावा केला की, मांजराला वाचवण्यासाठी जो ध्वज वापरण्यात आला, तो त्याच्या मालकीचा होता.

टॅग्स :FootballफुटबॉलAmericaअमेरिका