शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

कुत्र्या-मांजराचा फाईट वातावरण टाईट, पाहा कोण जिंकलं? शेवट झाला भयानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 15:32 IST

कुत्रा आणि मांजर एकमेकांचे वैरी मानले जातात. पण खरं हळू हळू या व्याख्या बदलायला लागल्यात. बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर कुत्रं आणि मांजर छान खेळताना दिसतात.

कुत्रा आणि मांजर एकमेकांचे वैरी मानले जातात. पण खरं हळू हळू या व्याख्या बदलायला लागल्यात. बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर कुत्रं आणि मांजर छान खेळताना दिसतात. आता तर आजकाल घरात कुठला प्राणी पाळायचं झालं तर एकाला कुत्रं आवडत असतं आणि एकाला मांजर मग भांडण होऊ नये किंवा कुणी नाराज होऊ नये म्हणून कुत्रं आणि मांजर दोन्ही प्राणी पाळले जातात. जे गुण्यागोविंदाने नांदतात सुद्धा! छान भावा बहिणीसारखे हे दोन प्राणी घरात राहतात. कधी भांडतात, मारामारी करतात. असे अनेक व्हिडीओ मग सोशल मीडियावर येतात आणि ते व्हायरल होतात. काय चाललंय ते पाहूया या व्हिडीओमध्ये.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका युझरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका घराच्या सोफ्यावर एक कुत्रा आणि मांजर एकमेकांशी भांडत आहेत आणि हे भांडण मजेशीर आहे. कुत्र्याने मांजरीला सोफ्यावर टाकून उशीने झाकलं आहे. त्यानंतर तो वारंवार डब्ल्यू-डब्ल्यू ई रेसलर प्रमाणे उशीवरून उडी मारतो आणि तिला चिडवण्यासाठी वारंवार तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. हा ट्रेंड अनेक वेळा चालतो. त्यातच मांजरही कुत्र्यावर पंज्यांनी हल्ला करते. इतक्यात कुत्रा खाली उतरून खालून मांजरीवर हल्ला करू लागतो, तर मांजरही त्याला हुसकावून लावायला बघते.

हा व्हिडिओ 59 सेकंदाचा आहे, मात्र लोकांना तो खूप आवडतोय. ज्या गमतीशीर पद्धतीने कुत्रे-मांजरं दिसतात, त्याचा आनंद लोक घेत आहेत. कुत्रा आणि मांजर यांच्यातलं असं भावा बहिणीचं नातं मजेशीर आहे. लोकांना या व्हिडिओचं फार कौतुक वाटतंय. व्हिडिओत पडलेल्या कुत्र्याला मांजर ज्या प्रकारे घाबरवते, तेही मजेशीर आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 25.4 मिलियन वेळा पाहण्यात आले आहे, यावरून या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. याशिवाय वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केले जात आहे. ती आवडणाऱ्या आणि त्यावर भाष्य करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया