शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! डोशासोबत सांबार न देणे पडले महागात, दंडासह ८ टक्के व्याज द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:14 IST

डोशासोबत सांबार न दिल्यामुळे एका रेस्टॉरंटला चांगलेच महागात पडले आहे.

आपण रेस्टॉरंटमध्ये डोसा मागवल्यानंतर त्यासोबत सांबारही दिले जाते. बिहारमध्ये एका रेस्टॉरंटला डोशासोबत सांबार न देणं महागात पडले आहे. जिल्हा ग्राहक आयोगाने आता रेस्टॉरंटला ३५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १५ ऑगष्ट २०२२ चे आहे. बिहार येथील जिल्हा मुख्यालयात असलेल्या बंगाली टोला येथील रहिवासी मनीष पाठक यांनी शहरातील एका रेस्टॉरंटमधून मसाला डोसा पॅक घरी आणला. 

या ऑर्डरसाठी त्यांनी १४० रुपये दिले होते. घरी पार्सल आणल्यानंतर मनीष यांना कळाले की रेस्टॉरंटने डोशासोबत सांबार दिले नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष तक्रार करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. यावेळी त्यांना रेस्टॉरंटमध्ये  उडवा-उडवीची उत्तर दिली.     

नवरदेव लपवत होता त्याचं टक्कल, नवरीकडील लोकांनी ठिकाणावर आली त्याची अक्कल

रेस्टॉरंटने यावेळी आपली चूक मान्य करण्याऐवजी रेस्टॉरंटच्या संचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर त्याने १४० रुपयांत संपूर्ण रेस्टॉरंट खरेदी करता येणार नसल्याचे सांगितले. 

यानंतर त्यांनी वकिलाकडून रेस्टॉरंटला नोटीस पाठवली, पण त्यांनाही याचे योग्य उत्तर मिळू शकले नाही. यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार केली.

या प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष कम निवृत्त न्यायाधीश वेदप्रकाश सिंह आणि सदस्य वरुण कुमार यांनी तक्रार योग्य असल्याचे आढळून आल्यावर रेस्टॉरंटला नुकसान भरपाई ठोठावली आहे. त्यांनी रेस्टॉरंटला सेवेतील कमतरतेसाठी २००० रुपये आणि वॉर्ड खर्च म्हणून १५०० रुपये म्हणजेच फिर्यादीला एकूण ३५०० रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम ४५ दिवसांत द्यावी लागेल. या कालावधीत रक्कम न दिल्यास आणखी आठ टक्के व्याज द्यावे लागेल, असंही ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलhotelहॉटेल