शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

या नव्या नवरीने कबरीसोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:51 IST

वेगवेगळ्या प्रकारच्या मनाला भिडणाऱ्या प्रेमकथा तुम्ही सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात पाहिल्या असतील. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी प्रेमाची खरी कहाणी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Image Credit : Credit: Loving Life Photography/Mandi Knepp)

वेगवेगळ्या प्रकारच्या मनाला भिडणाऱ्या प्रेमकथा तुम्ही सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात पाहिल्या असतील. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी प्रेमाची खरी कहाणी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जेसिका पेजॅट आणि केंडल मर्फी यांची ही प्रेमकहाणी. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते आणि लवकरच लग्न करणार होते. पण एका अपघातात जेसिकाने आपला होणारा पती गमावला. लग्न व्हायचं राहिलं. आता जेसिकाचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये जेसिका नवरीच्या वेशात आहे, तिच्या हातात पिवळ्या फुलांचा गुलदस्ता आहे. होय..हे फोटो तिच्या लग्नाचे आहेत. मनाला भिडणारी बाब म्हणजे जेसिकाने केंडल मर्फीच्या कबरीसोबत लग्न केलं.

गेल्यावर्षी केंडल मर्फी जो जेसिकासोबत लग्न करणार होता, त्याचा एका अपघातात मृत्यू झाला. हा घटनेमुळे जेसिकाच्या आयुष्यात मोठं वादळच आलं. त्यावेळी जेसिका २५ वर्षांची होती. पण तिने तिच्यावर कोसळलेल्या या दु:खाच्या डोंगरातही स्वत:ला सावरलं. तिने केंडलच्या मृत्यूनंतरही लग्न कॅन्सल केलं नाही. 

२९ सप्टेंबर हा दिवस जेसिकासाठी फार खास आहे. याच दिवशी ती नवरीच्या रुपात दिसली. हा तोच ड्रेस होता जो तिने तिच्या लग्नासाठी निवडला होता. जेसिका आणि केंडलच्या लग्नाला त्यांचे सर्व मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. अमेरिकेच्या इंडियानामध्ये झालेल्या या अनोख्या लग्नाला एका फोटोग्राफरने फार सुंदरपणे कॅमेरात कैद केले. 

केंडल हा अग्नीशमन दलामध्ये काम करत होता. त्या दिवशी तो कुणालातरी वाचवण्यासाठीच गेला होता. पण दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्marriageलग्न