शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video - "कोणी रडत का नाही?"; पाठवणीच्या वेळी वधूने विचारला प्रश्न; कुटुंबीयांनी दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 13:10 IST

Wedding Video : नवरीच्या पाठवणीचा असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही पोटधरून हसाल.

नवी दिल्ली - लाडक्या लेकीची पाठवणी करताना सर्वांचेच डोळे पाणवतात. लग्नानंतर जेव्हा मुलीला निरोप देण्याची वेळ येते तेव्हा वधूचे कुटुंबीय आणि नातेवाईक खूप भावूक होतात. मुलीला सासरी जाताना पाहून सर्वच रडायला लागतात. तो अत्यंत भावनिक क्षण असतो. फार कमी वेळा काही जण रडत नाहीत. सोशल मीडियावर लग्न समारंभातील असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. नवरीच्या पाठवणीचा असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही पोटधरून हसाल.

पाठवणीच्या वेळी वधूच्या घरातील कोणीही रडत नाही, तेव्हा ती निरागसपणे एक प्रश्न विचारते, जो ऐकून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. नवरीच्या प्रश्नावर तिथे उपस्थित लोकही भन्नाट मजेशीर उत्तर देतात. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नानंतर नववधू पाठवणीच्या वेळी गाडीमध्ये बसली आहे. कारच्या आजूबाजूला तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित आहेत. यादरम्यान, वधू कुटुंबातील सदस्यांना अतिशय गोंडसपणे विचारते की तुमच्यापैकी कोणीही का रडत नाही?

उभ्या असलेल्या महिला हसतात आणि उत्तर देतात की आम्ही का रडायचं. आमचा मेकअप खराब होईल. वधूचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. वधूचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर wedding_visual नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पाठवणीच्या वेळी नवरी नातेवाईकांना विचारते - तुमच्यापैकी कोणीही का रडत नाही?'. 10 मार्च रोजी अपलोड झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न