शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अलीराजपूरमधील आदिवासी पुरूषाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 18:14 IST

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे.

अलीराजपूर । 

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. आपल्या दोन्ही पत्नींचा विजय होताच माजी सरपंचाने दोन्ही पत्नींसोबत गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना ३५ वर्षीय माजी सरपंच समरथ मोरया यांनी सांगितले की, माझ्या तिसऱ्या बायकोने देखील निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा होती. मात्र यासाठी तिसऱ्या पत्नीला तिची शिक्षण विभागातील शिपायाची नोकरी सोडावी लागली असती म्हणून ती निवडणुकीस मुकली. 

३ पत्नी असणारा माजी सरपंच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर आणि अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या नानपूर गावचे रहिवासी समरथ यावर्षीच्या ३० एप्रिल रोजी खूप चर्चेत आले होते. कारण त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सकरी (२५), मेला (२८) आणि नानीबाई (३०) या तीन महिलांशी अधिकृतपणे विवाह केला.

समरथ हे सध्या ३ मुले आणि ३ मुलींचे बाबा आहेत. त्यांनी सांगितले की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. "मी २००३ मध्ये नानीबाई, २००८ मध्ये मेला आणि २०१७ मध्ये सकरीशी विवाह केला आहे. यावर्षी ३० एप्रिल रोजी नानपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले." अशी माहिती माजी सरपंच समरथ यांनी दिली. 

विजयामुळे आनंदच आनंदलक्षणीय बाब म्हणजे समरथ लग्न केल्यानंतर देखील जेवढा खुश झाला नाही तेवढा निवडणुक जिंकल्यानंतर झाला आहे. तो दिवसरात्र पार्टीमध्ये रमला असल्याचं त्याचा मित्र जितेंद्र वाणीने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले. अलीराजपूरचे रहिवासी भदौरिया म्हणाले की, त्यांचे विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार होत नाहीत. दरम्यान या माजी सरपंचाची सर्वत्र चर्चा रंगली असून ही निवडणुक सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशsarpanchसरपंचWomenमहिला