शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसच्या धडकेनं दुचाकी २० फुटांवर जाऊन पडली; तरुण थोडक्यात बचावला; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:34 IST

सुदैवानं तरुणाचा जीव वाचला; दुचाकीला एक्स्प्रेसची जोरदार धडक

अति घाई संकटात नेई असं म्हणतात. अनेकांना ही गोष्ट कळते, पण वळत नाही. अशी मंडळी मग संकटात सापडतात. जी वेळ ही मंडळी वाचवायला जातात, ती वेळच या मंडळींना असा काही दणका देते की त्यातून त्यांना आयुष्यभराचा धडा मिळतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे याचाच प्रत्यय आला आहे.

तारीख- १२ फेब्रुवारी.. वेळ- संध्याकाळची.. ६ वाजून १८ मिनिटांची.. एक्स्प्रेस ट्रेन जात असल्यानं सगळेजण फाटकाजवळ थांबले होते. मात्र तेवढ्यात एक तरुण दुचाकी घेऊन रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करू लागला. तो जवळपास मध्यापर्यंत पोहोचला. मात्र तोल गेल्यानं त्याची दुचाकी खाली पडली. तोदेखील कोसळला. तितक्यात भरधाव वेगानं एक्स्प्रेस ट्रेन त्याच्या दिशेनं आली.

तरुणाची दुचाकी रेल्वे रुळांवरून पडून होती. एक्स्प्रेस ट्रेन पाहून तरुण पळू लागला. तितक्यात एक्स्प्रेसनं दुचाकीला धडक दिली. दुचाकी जवळपास १५ ते २० फूट दूर जाऊन पडली. दुचाकीला धडक बसली त्यावेळी तरुण पडलेल्या दुचाकीवरच असल्यानं त्यालाही थोडी दुखापत झाली. मात्र त्याचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.