शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! बॉडी बनवण्याची घाई जीवावर बेतली; 'अशी' अवस्था झाली, फोटो पाहून काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:58 IST

मी अजूनही डॉक्टरांकडे जातो जेणेकरून मला या वेदनेतून सुटका मिळेल. या प्रक्रियेच्या प्रत्येक दिवशी २० हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो असं डेवनं सांगितले. 

फिटनेस इंडस्ट्रीमध्ये बॉडी मेंटेन करण्यासाठी किंवा लवकरच मसल्स गेन बनवण्यासाठी स्टेरॉयडचा वापर केला जातो. काहीवेळा त्या स्टेरॉयडचे दुष्परिणाम इतके गंभीर असतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. अलीकडेच एका प्रोफेशनल बॉडीबिल्डरने लवकर बॉडी बनवण्याच्या नादात स्टेरॉयडचं सेवन केले. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याच्या पाठीवर फोड आले त्यामुळे त्याला दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागते, ज्याचा खर्च २०००० रुपयांपेक्षा जास्त आहे. या त्रासामुळे त्याला झोपही येत नव्हती. या बॉडीबिल्डरने एक व्हिडिओ शेअर करत स्वत:चा अनुभव शेअर केला आहे.

कोण आहे हा बॉडीबिल्डर?स्टेरॉयड घेणाऱ्या व्यक्तीचं नाव डेव हार्ट्रे(Dave Hartrey) जो आयरलँडच्या वॉटरफोर्ड इथं राहणारा आहे. २४ वर्षीय डेवने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी २० वर्षाचा होता तेव्हापासून स्टेरॉयड घ्यायचो. हळूहळू माझ्या अंगावर फोडे यायला, चेहऱ्यावरही डाग दिसायचे. मी नेहमी फिटनेसच्या दृष्टीने काळजी घ्यायचो. वयाच्या १५ व्या वर्षापासून मी व्यायाम करतो. काही वर्षापूर्वी मी एका ट्रेनरच्या देखरेखीत ट्रेनिंग घेतली. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यानंतर मी प्रोफेशनल बॉडीबिल्डिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बॉडी बनवण्यासाठी किती वेळ लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी लवकरच बॉडी व्हावी यासाठी स्टेरॉयड घेण्याचा निर्णय घेतला. 

स्टेरॉयडच्या सेवनानंतर काही काळाने माझा टेस्टोस्टेरोन इतकं उच्च पातळीला गेले की त्यामुळे माझी तब्येत बिघडली. शरीरावर काहीतरी जळतंय असं वाटायला लागलं. त्यामुळे मी आता कुणालाही स्टेरॉयडचं सेवन करण्याचा सल्ला देणार नाही. कारण यामुळे माझी काय अवस्था झालीय ते कुणालाही न सांगण्यासारखी आहे असं डेवनं म्हटलं. 

दरम्यान, मला २०२० मध्ये पहिल्यांदा पुरळ आलं होतं, ज्यामुळे माझ्या पाठीवर फोडे आणि पुरळ उठले होते. स्टेरॉयडच्या सेवनामुळे माझ्या पाठीला, हाताला, तोंडाला सगळीकडे फोड्या आल्या. मी दिवसेंदिवस स्वत:ला दोषी समजायचो. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक होते कारण माझ्या शरीरातील फोडांमुळे खूप वेदना होत होत्या. मी शेवटी स्टेरॉयड घेणे बंद केले आणि नऊ महिने होम क्वारंटाईन झालो. माझी संपूर्ण पाठ जखमांनी भरलेली होती या जखमेचं कारण म्हणजे स्टेरॉयड घेतल्यामुळे आलेल्या फोड्या फुटल्या होत्या. मला बरे होण्यासाठी नऊ महिने लागले. पण तरीही पाठीवर आणि हातावर फोडांच्या खुणा आहेत. मी अजूनही डॉक्टरांकडे जातो जेणेकरून मला या वेदनेतून सुटका मिळेल. या प्रक्रियेच्या प्रत्येक दिवशी २० हजारांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो असं डेवनं सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्स