Bengaluru Professor Marathi Dance Video Viral: विविध महाविद्यालयांमध्ये हल्लीचा काळ हा कॉलेज फेस्टिव्हलचा असतो. प्रत्येक महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा फेस्टिव्हल्सचे आयोजन करत असतो. अशा फेस्टिव्हल्समध्ये विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांच्या कलागुणांनाही न्याय दिला जातो. सध्या बेंगळुरूमधील एका कॉलेज प्रोफेसरच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कॉलेजमधील सर्व विद्यार्थी प्राध्यापकांना एका प्रसिद्ध मराठी गाण्यावर नाचताना पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी आहेत. नटरंग चित्रपटातील लोकप्रिय लावणी वाजले की बारा या गाण्यावर या महिला प्रोफेसरने डान्स केला असून, हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
'वाजले की बारा'वर डान्स
ज्योती निवास कॉलेज ऑटोनॉमसच्या एका प्राध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडिओमध्ये असिस्टंट प्रोफेसर मंदारा गौडा 'वाजले की बारा' या मराठी सुपरहिट गाण्यावर एक अद्भुत परफॉर्मन्स देताना दिसत आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या नृत्याचा व्हिडिओ कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो अनेक युजर्सनी पसंत केला आहे. गुलाबी साडीमध्ये अप्रतिम डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या प्रोफेसरने साऱ्यांनाच अवाक केले आहे. पाहा व्हिडीओ-
रॅप्सोडी २०२५ कार्यक्रमाचा व्हिडिओ
सहाय्यक महिला प्राध्यापक मंदारा गौडा यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सव 'रॅप्सोडी २०२५' दरम्यान नृत्य केले. या कार्यक्रमानंतर, त्या सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नृत्याचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडिओचे खूप कौतुक होत आहे. प्रत्येकजण महिला प्राध्यापकांच्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याबाबत बोलताना दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये काहींनी त्यांच्या हावभावांचे कौतुक केले आहे तर काहींना त्यांच्या डान्स स्टेप्स खूप आवडल्या आहेत.