शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने सलग पाचव्यांदा दिला जुळ्या मुलांना जन्म; पतीने सोडले घर, झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 12:54 IST

दक्षिण आफ्रिकेतील युगांडा येथील महिलेने सलग पाचव्यांदा जुळ्या मुलाला जन्म दिल्याने तिचा पती फरार झाला आहे.

नवी दिल्ली: सोशल मीडियावर नेहमी काही ना काही अनोख्या गोष्टींची चर्चा होत असते, काही घटनांवर तर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या आफ्रिकेतील देश युगांडामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युगांडातील एका महिलेने पुन्हा पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला म्हणून तिचा पती फरार झाला आहे. विशेष म्हणजे महिलेने सलग पाचव्यांदा जुळ्या मुलांना जन्म दिलेल्या संतप्त पतीने तिला सोडून देण्याचा निर्णय घेतला. या घटनेवर अनेकांचा विश्वास बसत नाही मात्र ही सत्य घटना असून सोशल मीडियावर याची मोठी चर्चा रंगली आहे. 

या महिलेचे नाव नलोंगो ग्लोरिया असून तिने अलीकडेच दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिला पुन्हा एकदा जुळी मुलं झाल्याचे पतीला कळताच तो घर सोडून फरार झाला आहे. महिलेचा पती कुठं गेला आहे याची महिलेसह कोणालाच कल्पना नाही. एका मुलाखतीमध्ये याबाबतीत नलोंगा या महिलेने माहिती दिली. जेव्हा ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हाच तिच्या पतीने सांगितले होते की आता खूप झालं आहे, त्यामुळे तू घर सोडून कुठेतरी जा. कारण तिच्या पतीचे म्हणणे आहे की पुन्हा पुन्हा जुळ्या मुलांना जन्म देणं म्हणजे असामान्य आहे. 

पती झाला फरार

या धक्कादायक घटनेमुळे संबंधित महिला खूप त्रस्त असून सर्वकाही देवावर अवलंबून असल्याचं म्हणत आहे. मी १० मुलांना जन्म दिला असला तरी मला याचा अजिबात पश्चाताप होत नाही, जरी आपल्या पतीला एवढी मुलं आवडत नसली तरी असं महिलेने स्पष्ट केलं. पण मी माझ्या मुलांशिवाय कुठेही जाऊ शकत नाही मात्र माझी मुलं आता कुठं आहेत हे मला माहित नाही. अशा स्थितीत घरमालकाने मला घर रिकामे करण्यास सांगितले असल्याचे महिलेने अधिक सांगितले. त्यामुळे या महिलेसमोर या लहानग्यांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या अनोख्या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिलाhusband and wifeपती- जोडीदारSouth Africaद. आफ्रिका