शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! विहिरीत पडलेल्या ७० वर्षांच्या आजीला वाचवण्यासाठी पोलिसानं मारली उडी अन्....

By manali.bagul | Updated: November 15, 2020 12:21 IST

Inspirational Stories in Marathi :एका ७० वर्षीय आजीला वाचवण्यासाठी पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. 

(Image Credit- New indian Express) 

खाकी वर्दीच्या कर्तृवाच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील.  कोरोनाच्या महासंकटातही कर्तव्यावर हजर असताना कोणासाठी अन्नदाता तर कोणासाठी देवदूत बनून खाकी वर्दीने मदतीसाठी हात दिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहेत.  एका ७० वर्षीय आजीला वाचवण्यासाठी पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. 

आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील  गुदूर गावात बुधवारी ही घटना घडली. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जवळपास रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ड्यूटीवर हजर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल शिव कुमार आणि श्याम यांना  १०० क्रमांकावर एक फोन आला. यावेळी एक वृद्ध महिला विहिरीत पडल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांनी या  विहिरीजवळ  गर्दी केली होती. पण विहिरीच्या आत उतरून या वृद्ध महिलेला वाचवण्याचे धाडस कोणीही केलं नाही. अंधार आणि विहिर जास्त खोल असल्यामुळे स्थानिकांची हिंमत  झाली नाही. 

माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो

फोनला उत्तर दिल्यानंतर काहीवेळात कॉन्स्टेबल त्याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की वृद्ध महिला बी. सावित्री या कोणत्याही क्षणी विहिरीत बूडू शकतात. म्हणून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उडी मारण्याचं ठरवलं.  शिव कुमार यांनी सांगितले की, ''वृद्ध आजीला वाचवायचं हेच माझ्या डोक्यात होतं. या आजीला वाचवण्यासाठी मी उचलून माझ्या अंगावर ठेवण्याचा प्रयत्न केला.''  स्थानिक लोक आणि पोलिस कॉन्स्टेबल शिव कुमार, सुंदर यांना दोरखंड शोधण्याासाठी  जवळपास १० मिनिटांचा वेळ लागला. मग या दोन्ही पोलिसांनी मिळून आजींना सुखरूप बाहेर काढलं.

मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर या आजींंना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी स्थानिकांनी रुग्णालयाशी संपर्क साधला.  पण या आजींना नेण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आरएमपी यांना बोलावले. त्यांनी या आजींना योग्य उपचार दिले. स्थानिक लोक आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले.  पोलिसाच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल