शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले महिंद्रा; केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 16:05 IST

Anand Mahindra: आनंद महिंद्रानी दोन भावंडांचे व्हिडीओ केले शेअर; कचरा गोळा करणाऱ्या मुलांचा आवाज महिंद्रा भारावले

मुंबई: उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. प्रेरणादायी विचार, गोष्टी शेअर करणारे महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली आहे. आता महिंद्रा यांनी दिल्लीतल्या दोन भावांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांना मदत करण्यासाठी लोकांनी संगीत शिक्षकाची माहिती द्यावी, असं आवाहन महिंद्रा यांनी केलं आहे.आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील दोन भाऊ दिल्लीत कचरा वेचण्याचं काम करतात. मात्र या दोघांमध्ये एक कला दडली आहे. कचरा वेचणारे दोन्ही भाऊ उत्तम गातात. हाफिज आणि हबीबुर अशी दोघांची नावं आहेत. आनंद महिंद्रा यांना त्यांचा मित्र रोहित कट्टरनं हाफिज आणि हबीबुर यांचे व्हिडीओ पाठवले. ते महिंद्रा यांनी ट्विटरलर शेअर केले.  'अतुल्य भारत! माझा मित्र रोहित कट्टर याने हे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांना सोशल मीडियावर हे व्हिडीओ मिळाले. हाफिज आणि हबीबुर हे दोन्ही भाऊ अतिशय मेहनती आहेत. ते दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत कचरा गोळा करण्याचं काम करतात. प्रतिभा कुठे आणि कोणामध्ये सापडेल, याची तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही,' असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये महिंद्रा यांनी दोन्ही भावांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. 'या दोघांमध्ये कमालीची प्रतिभा आहे. या दोघांना संगीताचं शिक्षण मिळावं यासाठी मदत करण्याचा निश्चय मी आणि रोहितनं केला आहे. दोन्ही भाऊ दिवसभर कामात असतात. त्यामुळे त्यांना संध्याकाळी संगीत शिकवू शकेल, असा शिक्षक मिळू शकेल का? दिल्लीत राहणारी कोणी व्यक्ती याबद्दलची माहिती देऊ शकेल का?' असं महिंद्रा यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटर