शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

80 वर्षीय वृद्धाचे वडाच्या झाडात चहाचे हॉटेल; आनंद महिंद्रांनी ठेवले हॉटेलचे अनोखे नाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:13 IST

Tea Shop Under Tree In Amritsar : आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Temple of Tea Service Viral Video : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात. त्यांनी एखादी पोस्ट करताच ती व्हायरल होते. आता त्यांचे नवीन ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. आता आनंद यांनी अमृतसरमधील एका छोट्याशा चहाच्या हॉटेलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हे सामान्य चहाचे हॉटेल नाही, तर एका मोठ्या वडाच्या झाडात थाटलेलं हॉटेल आहे. मोठ्या वडाच्या झाडात एका 80 वर्षीय वृद्धाने हे चहाचे छोटेसे हॉटेल सुरू केले आहे. त्या वृद्धाच्या साधेपणामुळे फक्त आनंद महिंद्राच नाही, तर लाखो नेटीझन्सचेही मन जिंकले आहे. म्हणूनच आनंद महिंद्रा यांनी या चहाच्या हॉटेलला 'चाय सेवा का मंदिर' (चहा सेवेचे मंदिर) नाव दिले आहे. 

हा हृदयस्पर्षी व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, अमृतसरमध्ये पाहण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. पण, पुढच्या वेळेस मी जेव्हा अमृतसरमध्ये जाईन, तेव्हा सुवर्ण मंदिरासोबतच या चहा सेवेच्या मंदिरातही जाईन. हे बाबा 40 वर्षांहून अधिक काळापासून हे हॉटेल चालवत आहेत. आनंद महिंद्रा यांनी 23 जुलै रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला 3 लाख 78 हजार व्ह्यूज आणि 12 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Viralसोशल व्हायरलamritsar-pcअमृतसर