शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

बोंबला! आर्टिस्टने विस्फोटक लावून उडवली लक्झरी लॅम्बॉर्गिनी कार, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:21 IST

अमेरिकेतील या आर्टिस्टने क्रिप्टो करन्सीला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास ५ कोटी रूपये किंमतीची लॅम्बॉर्गिनी कार विस्फोटक लावून उडवली. 

सोशल मीडियावर कधी कधी असे काही व्हिडीओ बघायला मिळतात, जे बघून हैराण व्हायला होतं. सोबतच आपण विचारातही पडतो. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तोही असाच हैराण करणारा आहे. एका कॉन्सेप्चुअल आर्टिस्टने विरोधाची एक अशी पद्धत निवडली आहे, ज्याबाबत वाचून सगळेच चक्रावून गेले आहेत. अमेरिकेतील या आर्टिस्टने क्रिप्टो करन्सीला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास ५ कोटी रूपये किंमतीची लॅम्बॉर्गिनी कार (Lamborghini) विस्फोटक लावून उडवली. 

या आर्टिस्टला Shl0ms नावाने ओखळलं जातं. तो म्हणाला की, क्रिप्टोच्या माध्यमातून जो लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं कल्चर सुरू झालं आहे, त्याला विरोध दर्शवण्यासाठी त्याने गेल्या महिन्यात अमेरिकेत एका अज्ञात ठिकाणी सेकंड हॅंड लक्झरी लॅम्बॉर्गिनी कार स्फोटकं लावून उडवली. आता लॅम्बॉर्गिनी ह्यूराकनचे जळालेला तुकडे या आठवड्याच्या शेवटी NFT च्या रूपात लिलाव केले जातील. या आर्टिस्टनुसार, क्रिप्टो टेक्नॉलॉजीचा वापर इतर लाभदायक उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. पण त्याद्वारे काही भयानक गोष्टी केल्या जात आहेत.

फॉर्च्यूनच्या एका रिपोर्टनुसार, शोम्स नावाच्या या आर्टिस्टने ज्या लॅम्बॉर्गिनीला उडवलं तिचे ९९९ तुकडे लिलावात विकले जाणार आहेत. ज्यातील ८८८ जळालेले तुकडे एनएफटीच्या रूपात विकले जातील. तर १११ तुकडे एका अज्ञात खरेदीदारासाठी आणि कलाकारांच्या टीमसाठी ठेवले गेले आहेत.

NFT काय आहे?

क्रिप्टो करन्सी एक व्हर्चुअल करन्सी आहे. ती नोट किंवा नाण्याप्रमाणे हातात घेता येत नाही. ती डिजिटल असते. तेच NFT चा अर्थ नॉन फंजिबल टोकन आहे. हे बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो करन्सी सारखंच एक क्रिप्टो टोकन आहे. हे डिजिटल आहे. जे वस्तूची व्हॅल्यू जनरेट करते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके