शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी झालं..हिंदी झालं आता 'श्रीवल्ली'चं भोजपुरी व्हर्जन पाहिलंत का?... तुम्हीही म्हणाल 'पागल कईले बा!' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:13 IST

'पुष्पा' या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटानं संपूर्ण देशभरात नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरला आहेच. पण चित्रपटातील गाण्यांनी देखील यंगीस्तानला 'याड' लावलं आहे.

'पुष्पा' या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटानं संपूर्ण देशभरात नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरला आहेच. पण चित्रपटातील गाण्यांनी देखील यंगीस्तानला 'याड' लावलं आहे. गाण्यांमधील हटके स्टेप्स तरुणाईचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. त्यातच श्रीवल्ली गाण्याचे आजवर अनेक भाषांमधील व्हर्जन्स सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहेत. 

नुकतंच श्रीवल्ली गाण्याचं मराठी व्हर्जन देखील आलं होतं आणि ते सोशल मीडियात जोरदार हिट ठरत असतानाच आता या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन देखील आलं आहे. भोजपुरीतही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. श्रीवल्ली गाणं मूळचं सिड श्रीराम यांनी गायलं आहे. तर याचं हिंदी व्हर्जन लोकप्रिय बॉलीवूड गायक जावेद अली यांनी गायलं आहे. आता या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन बाजारात आलं आहे. 

श्रीवल्ली गाण्याचं भोजपुरी व्हर्जनचा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडवलर शेअर केला आहे. 'भोजपुरीमध्ये इतकं मधुर गीत...वाह', असं कॅप्शन या व्हिडिओला अवनीश शरण यांनी दिलं आहे. 

दोन मिनिटं २० सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ६८ हजाराहून अधिक वेळा पाहण्यात आलं असून ५ हजाराहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. गाणं पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मी पहिल्यांदाच एखादं भोजपुरी गाणं अगदी शेवटपर्यंत पाहिलं आहे', असं एका युझरनं म्हटलं आहे. तर आणखी एकानं भोजपुरी भाषेत जो गोडवा आहे, आपलेपणा आणि प्रेम आहे. ते इतर कोणत्याही भाषेत नाही, असं म्हटलं आहे. सुंदर आवाज आणि अचूक शब्दांची निवड करुन छान जमलं आहे, असंही एकानं म्हटलं आहे. 

टॅग्स :Pushpaपुष्पाAllu Arjunअल्लू अर्जुनSocial Viralसोशल व्हायरल