Viral Video : निसर्ग आपल्याला आश्चर्याचा धक्का देण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अनेकदा तर अशा गोष्टी बघायला मिळतात की, डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक अवाक् करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, गोठवणाऱ्या थंडीत एक मगर स्वत:ला कशी जिवंत ठेवते. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, तलावातील पूर्ण पाणी गोठून बर्फ झालं आहे.
गोठलेल्या पाण्याखाली मगर शांत बसून असल्याचं दिसत आहे. खाली अजिबात हालचाल नाही. सुरूवातीला पाहिल्यावर हेच वाटतं की, मगर जिवंत आहे की नाही. पण काही वेळानं मगर हालचाल करते. पण इतक्या थंडी मगर जिवंत कशी राहते, हे जाणून घेऊ.
कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे की, मगर ब्रूमेशनमुळे जिवंत राहतात. ब्रूमेशन म्हणजे रॅपटाइल्सची सक्रियता कमी होणं. ते एकप्रकारे शीतनिद्रेत चालले जातात आणि असं करून ते ही वेळ मारून नेतात. यादरम्यान ते नाक पाण्याच्या वर ठेवतात आणि शरीर स्थिर ठेवतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम हॅंडल iron.gator वर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'अनेकदा मगरींचा सामना गोठवणाऱ्या थंडीसोबत होत असतो आणि अशात त्या बर्फात अडकून पडतात. अशात जिवंत राहण्यासाठी मगर ब्रमेशन स्थितीत जातात. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
मगरीचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत. तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेक लोक म्हणाले की, 'मगर योद्धा आहे'. तर अनेकजण म्हणाले की, अजूनही यावर विश्वास बसत नाही.