शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोत प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:59 IST

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

viral video : हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तरूणाई भन्नाट व्हिडीओ करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्संना आकर्षित करण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याबद्दल न बोललेच बरं. यातून सार्वजनिक ठिकाणं देखील बाजूला राहिली नाहीत. मेट्रो, रेल्वे स्थानक येथील काही ना काही विचित्र घटना समोर येत असतात. अशातच दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. 

दिल्ली मेट्रोत प्रेमी युगुलांचा वाढता वावर आणि त्यांचे अशोभनीय कृत्य वारंवार समोर येत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. आता दिल्ली मेट्रोतील नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे भांडण एक महिला आणि प्रेमी युगुलामध्ये झाल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी या जोडप्याने अश्लील कृत्य केल्याने महिला संतापली अन् तिने सर्वांसमोर या प्रेमी युगुलाचा समाचार घेतला. 

मेट्रोत प्रेमी युगुलाला रोमान्सची 'लहर'व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, मेट्रोच्या डब्यात खूप गर्दी असून खूप प्रवासी उभे आहेत. अशातच तिथे उभे असलेल्या एका प्रेमी युगुलाने एकमेकांच्या गालावर चिमटे काढताच वृद्ध महिला संतापली. जोडप्याचं कृत्य पाहताच महिलेला राग अनावर झाला अन् तिनं त्यांना सुनावलं. "तुझं काय चाललंय,  कधी त्याच्या केसांना हात लावतेस, कधी गालाला गोंजरतेस... लोक पण अशीच आहेत कोणीच काही बोलत नाही", असे संबंधित महिलेने मुलीला सुनावताना म्हटले. खरं तर मुलीनं देखील महिलेला प्रत्युत्तर दिलं. 'तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे', असं मुलीनं म्हणताच महिलेने म्हटले, "मी सांगते ना... हे चांगलं वाटत नाही. रोमान्स करायचा असेल तर बाहेर जाऊन कर." महिलेचा राग पाहता इतर प्रवाशांनी देखील प्रेमी युगुलाला सुनावलं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdelhiदिल्लीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट