शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:35 IST

नाला खोदण्यास सुरुवात केल्यानंतर सोन्याचे नाणे सापडण्यास सुरूवात झाली.

उत्तर प्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील एका गावात ड्रेनेजची पाईटपलाईन  काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये ११ सोन्याची नाणी सापडली आहेत. यामुळे संपूर्ण गावात मोठा गोंधळ उडाला आहे.हे पाण्यासाठी आणि नाणे घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. नंतर पोलिसांनी काही नाणी जप्त करून सील केली.

ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.  गावातील स्थानिक रहिवासी पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करत होते. गावकऱ्यांनी देणग्या गोळा केल्या आणि खोदकाम सुरू केले. यावेळी अचानक, खोदकाम करताना, मातीखालून चमकदार धातूच्या वस्तू बाहेर आल्या, ते सोन्याची नाणे असल्याचा दावा सुरू आहे. 

हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गावकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आम्ही पाच-सहा कुटुंबांनी मिळून पाईप टाकण्यासाठी नाला बांधण्यासाठी पैसे गोळा केले होते. जेव्हा आम्ही कोरडी माती भरण्यासाठी खड्डा खोदला तेव्हा आम्हाला नाणी दिसली. सुरुवातीला आम्हाला ११ नाणी सापडली, पण नंतर खोदकाम सुरू असताना लोकांना आणखी नाणी सापडली. 

"ज्यांनी नाणी पाहिली त्यांनी आणखी नाणी मिळवण्यासाठी खोदकाम वाढवले. काहींनी हातांनी खोदकाम सुरू केले, तर काहींनी बांबू आणि फावड्यासह खोदकाम सुरू केले.

पोलिसांनी सर्व जप्त केले

उत्खननादरम्यान सोन्याचे नाणी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्थानिक पोलिस स्टेशन क्वार्सीचे एसएचओ यांना माहिती मिळताच ते त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.

पोलिस येताच काही लोकांनी त्यांना सापडलेली नाणी पोलिसांकडे सोपवली. अकरा नाणीही पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. परंतु गावात अशी चर्चा आहे की काही लोकांकडे अजूनही अनेक नाणी आहेत. पोलिसांसोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी नंतर संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि जे काही सापडले ते जप्त करून सील केले. चांदीचे नाणे, अँटीमोनी मणी आणि २५० ग्रॅम धातूची वीट यासारख्या वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GoldसोनंSocial Viralसोशल व्हायरल