शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराने पुतळ्यावर घातली शेरवानी; नेटकऱ्यांनी बराक ओबामा म्हणत चांदणी चौकात केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 17:24 IST

सध्या सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.

नवी दिल्ली : सध्या सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. दुकानदार देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. सध्या असाच एका कपड्याच्या दुकानातील पुतळ्याचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याच्यावर आकर्षित करणारी शेरवानी घालण्यात आली आहे. कधी कधी हे पुतळे खऱ्या माणसासारखेच दिसतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोतील पुतळा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा दिसणारा आहे. हा फोटो खूप व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

'ओबामांचा दिवाळी पोशाख'

हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे पुतळ्याचा चेहरा. खरं तर कपड्याच्या दुकानात उभा असलेला हा पुतळा हुबेहुब अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा दिसतो आहे. ज्याला निळ्या रंगाची शेरवानी घालण्यात आली आहे. हा फोटो १८ ऑक्टोबर रोजी @lilcosmicowgirl या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ओबामांचा दिवाळी पोशाख. सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट जुगाड? 

चांदणी चौकात स्वागत

दिवाळीच्या मुहूर्तावर या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र हा फोटो नेमका कोणत्या दुकानातील आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र नेटकऱ्यांनी यावरून मजेशीर मीम्स व्हायरल केले आहेत. काहींनी मजेशीरपणे म्हटले की, लवकरच ओबामा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. एकाने लिहिले, 'चांदनी चौकात स्वागत आहे', तर काही युजर्संनी लिहले की, भारतीयांचा हा अप्रतिम जुगाड आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmemesमिम्सAmericaअमेरिका