शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हे काय नवीन! हेल्मेट न घातल्याबद्दल कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला दंड, दुप्पट रकमेचे चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:29 IST

आपण कार किंवा बाईक चालवत असताना आपल्याला अनेक नियम लागू असतात. आपण ते नियम तोडले तर आपल्याला दंड होऊ शकतो. 

आपण कार किंवा बाईक चालवत असताना आपल्याला अनेक नियम लागू असतात. आपण ते नियम तोडले तर आपल्याला दंड होऊ शकतो. रस्त्यावर कार, दुचाकी किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, पोलीस, वाहतूक पोलीस तुम्हाला दंड आकारतात.सध्या ऑनलाईन पद्धतीने चलन पाठवले जाते. सध्या सोशल मीडियावर एक चलन व्हायरल झाले आहे. यामध्ये हेल्मेट न घातल्यामुळे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचे चलन कापण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील आहे. ग्वालेरमध्ये एक कार ओव्हरस्पीडिंगसाठी थांबवण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचे चलन कापले. या तरुणाला पोलिसांकडून चलन स्लिप मिळाल्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.या  चलन स्लिपवर हेल्मेट न घातल्याबद्दल 250 रुपये दंड लिहिला होता आणि पोलिसांनी त्या व्यक्तीकडून 500 रुपये वसूल केले.

हा डान्स आहे की व्यायाम? बघा स्वत:च्याच लग्नात कशी नाचतेय ही नवरी, पाहून सगळेच म्हणाले.....

पोलिसांचा असा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.  निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, जर चालान जारी करताना अशी चूक करणारी व्यक्ती दोषी आढळली तर त्याला निलंबित करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

जर तुम्ही कारने जात असाल आणि एखादा पोलीस तुमची कार ओव्हरस्पीडमध्ये आहे असे सांगून दंड करतात. पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या जवळच्या स्पीड टेस्टिंग मशीनमध्ये रेकॉर्ड केलेल्या कारचा वेग, कार किती वेगाने होती याबद्दल विचारले पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्याकडे मशीन नसेल तर तो योग्य वेग सांगू शकत नाही. याशिवाय मशिनमध्ये जरी स्पीड आला तरी तुम्ही ज्या रस्त्याने चालत आहात त्याची वेगमर्यादा किती आहे हे कळायला हवे. त्यात तुमचा दोष नसला तरीही पोलिसांचे चुकीचे चालान कापले तरी त्याची तक्रार तात्काळ वरिष्ठांकडे करावी, तु्म्ही अगोदर त्या दंडाची शहानिशा केली पाहिजे, सध्या ऑनलाईन पद्धतीने चलन येत आहेत.  

टॅग्स :Policeपोलिसcarकार