शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

'दादाजी ने वाट लगा दी'! भारतातून पाकमध्ये आल्याचा पश्चाताप; महिला पत्रकाराचं ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 11:17 IST

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तान सध्या आर्थिक तंगीने हैराण झाला आहे. त्यात पाकिस्तानच्या महिला पत्रकार आरजू काझमी यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी हिंदुस्तानात राहणारी होते, पण माझ्या आजोबाने दिल्ली, प्रयागराजहून पाकिस्तानला पलायन केले आणि तिथेच वास्तव्यास राहिले. पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती खालावली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत ताटकळत राहावं लागतंय. खाद्यपदार्थाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातूनच आरजी काझमीने हे ट्विट केलंय अशी चर्चा आहे. 

भारत सोडल्याचा होतोय पश्चातापआरजूने त्यांच्या पूर्वजांच्या १९४७ मध्ये भारतातून पाकिस्तानात येण्याच्या निर्णयाने पश्चाताप व्यक्त करत ट्विट केलंय की, माझ्या कुटुंबाला आणि मला वाटतंय पाकिस्तानात काही भविष्य नाही. माझे आजोबा आणि त्यांच्या कुटुंबानी भविष्यासाठी दिल्ली, प्रयागराज सोडून पाकिस्तानची वाट धरली होती. आजोबांनी वाट लावली. आरजूने केलेल्या ट्विटवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

भारतात या, लोकांनी दिले निमंत्रणअफशान नावाच्या युजरने लिहिले की, 'माझे आजी-आजोबा बिहार आणि यूपीमधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते आणि त्यांना त्यांच्या निर्णयाचा शेवटच्या श्वासापर्यंत पश्चाताप होत होता. तर 'मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. माझ्या आजोबांनीही तेच केले आणि अखेर आमची परिस्थिती बिघडली असं समीर अहमद नावाच्या युजरने सांगितले. आरजूला उत्तर देताना जगदीश नावाच्या युजरने लिहिले, 'योगी जी घरवापसी करतील. काळजी करण्यासारखे काही नाही, अब्बा (भारत) यांचं मन खूप मोठं आहे असं  मंजूर अहमद यांनी लिहिले. यानंतर अनेकांनी आरजूला भारतात येण्याचे निमंत्रण दिले. वाचा आरजू काझमीनं केलेलं ट्विट

कोण आहे आरजू?पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे. त्याशिवाय तिने पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचाही अनेकदा पर्दाफाश केला आहे. कराचीतील ट्रिनिटी मेथडिस्ट चर्चमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित पंजाब विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे वडील भारतातून (अलाहाबाद-प्रयागराज) पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. ते त्यांच्या काळातील एक प्रतिष्ठित पत्रकार देखील होते आणि त्यांच्या आईने अंबाला कॅंटमधून स्थलांतर केले होते. त्यांचे वडील सय्यद सलाहुद्दीन काझमी हे देखील पत्रकार होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारकडून सुवर्णपदक मिळाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत