शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्वत:शीच लग्न केलेली एकाकी सुंदरी ‘नाहीशी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 08:31 IST

मृत्यूच्या केवळ काही काळ आधी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये आपल्या ‘वेट लॉस’विषयीही चिंता व्यक्त केली होती.

तुर्कीची टिकटॉक इन्फ्लुएंसर कुबरा अयकुट तुम्हाला आठवते? आपल्या सौंदर्यानं तर तिनं जगभरातील लोकांना घायाळ केलं होतंच; पण, बराच काळ ती चांगल्या जोडीदाराच्याही शोधात होती. एखादा चांगला मुलगा पाहून त्याच्याशी लग्न करावं, मुलं जन्माला घालावीत आणि आनंदानं संसार करावा, अशी सुखी आयुष्याची स्वप्नं ती रंगवत होती. पण, बराच शोध घेऊनही तिला आपल्या मनासारखा जोडीदार मिळालाच नाही. काही जणांनी खोट्या बतावण्या करून तिला फसवण्याचाही प्रयत्न केला. ही गोष्ट लक्षात आल्यावर तिला फारच वाईट वाटलं. आपण इतके चांगले आहोत, इतरांचा मनापासून विचार करतो, शिवाय प्रत्येकाच्या भल्याचंच पाहत असूनही आपल्याच वाट्याला अशा गोष्टी का याव्यात यानं ती व्यथित झाली होती..

मनपसंत सुस्वभावी, चांगला जोडीदार मिळत नाही हे पाहिल्यावर तिनं एक वेगळाच जगावेगळा निर्णय घेतला होता. काय होता हा निर्णय? - चांगल्या जोडीदाराचा तिचा शोध संपल्यावर तिनं स्वत:शीच लग्न केलं होतं आणि त्याचे फोटो, व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. ‘वेडिंग विदाउट अ ग्रूम’ या तिच्या व्हिडीओवर तर लोकांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. २०२३ची ही गोष्ट. तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांनाही खूप वाईट वाटलं होतं. आपल्या या निर्णयाचा तिनं फेरविचार करावा, अशी आग्रही विनंतीही तिला अनेकांनी केली होती. 

बऱ्याच जणांनी तर मीच तुझ्यासाठी किती उत्तम जोडीदार आहे, म्हणून स्वत:च्या कौतुकाच्या कहाण्याही फोटो, व्हिडीओसह तिला पाठवल्या होत्या. इतर लोकांनी तुला भले फसवलं असेल; पण, मी मात्र तुला आयुष्यभर जपेन, अनंतापर्यंत तुझ्यावर प्रेम करीत राहीन आणि तुला कधीच अंतर देणार नाही, तू फक्त माझी हो.. म्हणून तिच्यासाठी प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या.अर्थातच तिनं कोणाचंही म्हणणं मनावर घेतलं नाही आणि ‘अविवाहित’ राहण्याच्या आपल्या निर्णयावर ती ठाम राहिली. दरम्यान, तिची लोकप्रियता मात्र वाढतच होती. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. टिकटॉकवर तिचे दहा लाखांपेक्षा अधिक तर इन्स्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते, पण, हीच हसरी-खेळती, चुलबुली कुबरा अचानक ‘नाहीशी’ झाली आहे. तिनं स्वत:हूनच हे जग सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच २६ वर्षीय या सुंदरीनं आत्महत्या केली. इस्तंबुलच्या सुल्तानबेली जिल्ह्यातील एका लक्झरी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तिनं उडी मारली आणि स्वत:चं आयुष्य संपवलं. तिच्या या कृत्याचा चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे.

आत्महत्येपूर्वी तिनं ‘सुसाइड नोट’ही लिहून ठेवली होती. ‘एकटेपणा’शी चाललेल्या संघर्षाची व्यथा तिनं त्यात मांडली होती. याशिवाय सातत्यानं होत असलेल्या ‘वेट लॉस’विषयीही तिनं चिंता व्यक्त केली होती. या विस्तृत सुसाइड नोटमध्ये तिनं म्हटलं होतं, “मी स्वत:च्या इच्छेनंच या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारते आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझं आयुष्य स्वेच्छेनं संपवते आहे; कारण मला आता जगायचं नाहीए. माझ्या ‘फिस्टिक’ची मात्र काळजी घ्या. (फिस्टिक हे तिच्या कुत्र्याचं नाव.) माझ्या आयुष्यात मी प्रत्येकाशी चांगलं वागले, कुणालाच दुखावलं नाही. माझ्या स्वत:शीच मात्र मी तेवढं चांगलं वागू, राहू शकले नाही. स्वार्थी, सेल्फिश राहणं हाच जगाचा नियम आहे. तरच तुम्ही सुखी राहू शकता. मला मात्र ते मान्य नाही...”

याच सुसाइड नोटमध्ये तिनं पुढे म्हटलं होतं, “गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक पातळ्यांवर माझ्या परीनं मी संघर्ष करीत होते; पण, कोणाच्या ते साधं लक्षातही आलं नाही, याचा मला फार खेद वाटतो. त्याचवेळी मी मात्र प्रत्येकाची काळजी करीत होते. त्यांच्या भल्याचा विचार करीत होते. मी हे (स्वार्थी) जग सोडून चाललेय; कारण माझं माझ्यावर प्रेम आहे. मला कधीतरी स्वत:विषयी विचार करायचाच होता, स्वत:चा निर्णय घ्यायचाच होता, तो मी आता घेते आहे..”

दिवसाला किलोनं घटत होतं वजन!मृत्यूच्या केवळ काही काळ आधी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये आपल्या ‘वेट लॉस’विषयीही चिंता व्यक्त करताना कुबरानं म्हटलं होतं, “माझं वजन वाढवण्याचा मी जिवापाड प्रयत्न करतेय; पण, वाढण्याऐवजी उलट दिवसाला एक किलो या वेगानं ते घटतच चाललंय. काय करावं काहीच समजत नाहीए. ‘वेट गेन’साठी तातडीनं काहीतरी करायला हवं..” कुबराला तिचं प्रेम न मिळाल्याबद्दल चाहत्यांनी खेद व्यक्त केला असला, तरी तज्ज्ञांचं मात्र म्हणणं आहे, ‘एकटे’पणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे एकटं कुढत राहू नका. लोकांत मिसळा..

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया