Google Maps : गुगल मॅप आपल्याला एखाद्या पत्त्यावर जाण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. आता कुठेही जाणे या गुगल मॅपमुळे सोपे झाले आहे. पण, सध्या गुगल मॅपचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये एका ठिकाणी रद्दीचा वापर करुन मोठ्या फलकमध्ये Help आणि Traffico या हे शब्द लिहिले आहेत. हे साईन मोठ्या साईजमध्ये आहेत हे गुगल मॅपवरुन सहज दिसत आहे. या शब्दाचा संदर्भ मानव तस्करी सोबत जोडला जात आहे.
IPS नोकरी सोडून अचानक लंडनला गेलेली ही महिला अधिकारी कोण?; सरकारकडून राजीनामा मंजूर
हे फलक रिकाम्या जागेवर आणि रेल्वे रुळांजवळ बनवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी लोकांची ये-जा दिसत नाही. आता फलकांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत फोटो व्हायरल झाले आहे.
नेटकरी याबाबत एक्सवर पोस्ट करत आहेत. एका नेटकऱ्याने पोस्टमध्ये लिहिले की, हे मानवी तस्करीचे संकेत देत आहे. प्रादेशिक प्राधिकरणाने त्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. हे चिन्ह गुगल मॅप्सवर देखील पाहता येतात, याचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर देखील शेअर केले आहेत. अनेक लोकांनी घटनास्थळी जाऊन व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पोस्ट केला.
गुगल मॅप्सच्या सॅटेलाइट व्हर्जनमध्ये अनेक ठिकाणी मोठे मदतीचे फलक दिसतात. एका ठिकाणी ट्रॅफिको लिहिलेले आढळले.
एक्सवरील पोस्ट
अनेक वापरकर्त्यांनी गुगल मॅप्सचे स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर केले, तर काहींनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि ट्रॅफिको सारखे शब्द असलेल्या चिन्हांचे फोटो शेअर केले. इंग्रजी शब्द Help म्हणजे मदत आहे आणि "Traffico" म्हणजे मानवी तस्करी असा अर्थ होतो.
पोलीस आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हेल्प आणि ट्रॅफिको सारख्या शब्दांसह चिन्हे कोणी तयार केली याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून असे दिसून येते की हा फोटो रेल्वे यार्ड किंवा समुद्री बंदराजवळचा आहे.
दगडांवरही हेल्प लिहिले
बऱ्याच ठिकाणी, Help सारखे शब्द जंकच्या मदतीने लिहिले जातात किंवा तयार केले जातात. हे एक रेल्वे यार्ड असल्याचे दिसत आहे, तिथे सहसा जास्त लोक येत-जात करत नाहीत.
एक्सवर एका वापरकर्त्याने ४४ सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मॅपमध्ये रेल्वे ट्रॅकला फॉलो करुन दाखवले आहे.