शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:01 IST

मोबाईलच्या दुनियेमुळे प्रेमीयुगुलांना थोडीफार मदत झाली असली तरी यामुळे अनेकदा त्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत.

Girlfriend Boyfriend Viral Video : सोशल मीडियाच्या या जगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काय निभाव नाही. आताच्या घडीला प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने एखादी घटना अथवा व्हिडीओ लगेच सर्वत्र पसरतात. मोबाईलच्या दुनियेमुळे प्रेमीयुगुलांना थोडीफार मदत झाली असली तरी यामुळे अनेकदा त्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. एखाद्या चित्रपटातील सीनसारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक घटना ओडिशातून समोर आली आहे. प्रेयसी आणि प्रियकर यांची भेट सामान्य असली तरी संबंधित तरुणीने घरच्यांना फसवून प्रियकराला आपल्या घरी बोलावले असता त्यांची चांगलीच फजिती झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरे तर झाले असे की, प्रेयसीने प्रियकराला भेटीसाठी घरी बोलावले असता अचानक तिच्या घरच्यांनी तिथे उपस्थिती दर्शवली. मग घाबरलेल्या तरुणीने तिच्या प्रियकराला चक्क एका पेटीत लपवले. मात्र, तिच्या घरच्यांना संशय आल्याने खूप वेळ वादावादी झाल्यानंतर अखेर पेटी उघडायला लावली. सुरुवातीला बराच वेळ तरुणीने पेटी उघडण्यास नकार दिला. पण, नंतर घरच्यांनी खूप दबाव टाकल्यानंतर तिला शरणागती पत्करावी लागली. पेटी उघडताच संबंधित तरुण बाहेर आला मग तरुणी त्याला वाचवताना दिसते. 

दरम्यान, प्रेयसी आणि प्रियकर एका खोलीत भेटीसाठी एकत्र आले होते. तिथे अचानक मुलीच्या घरचे पोहोचले. मग त्यांची तारांबळ उडाली आणि भीतीपोटी प्रियकराला पेटीत लपवण्याची वेळ प्रेयसीवर आली. पण, रंगेहाथ सापडल्याने मुलीचीदेखील बोलती बंद झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ओडिया भाषेतील संवाद ऐकायला मिळतो. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप स्पष्ट नसले तरी ओडिशातील हे प्रकरण असल्याचे समजते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट