शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात फुल स्पीडनं धावत होती पर्यटकांनी भरलेली नाव, लाट येताच झटक्यात विखुरले लोक; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 14:42 IST

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, समुद्राच्या लाटेत नाव बुडते. यामुळे सर्वच पर्टक समुद्रात पडतात. यावेळी सर्वच लोक सुद्रातून पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

पर्यटनस्थळांवर पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण  विविध प्रकारचे साहसी खेळ आयोजित करत असतात. यात पर्यटकही मोठ्या हिरिरीने भाग घेताना दिसतात. या दरम्यान अनेक वेळा दुर्घटना होऊन अनेक जण जखमीही होताना दिसतात. असा एका समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करतानाचा पर्यटकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात पर्यंटक फुल स्पीड बोट राईडचा आनंद घेताना दिसत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक विविध प्रकारच्या साहसी खेळांमध्ये भाग घेताना दिसतात. यादरम्यान कुणी समुद्राच्या उंच लाटांवर स्वार होताना दिसतं तर कुणी अंडरवाटर विश्वाचा आनंद घेताना दिसतं. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे, यात पर्यंटक आपली बोट पूर्ण वेगाने समुद्राच्या लाटांकडे नेताना दिसत आहे. यानंतर ती एका मोठ्या लाटेने उलटते.

उंच लाटेने बुडाली नाव - हा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ट्विटरवर @OnlyBangersEth नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक नाव फुल स्पीडमध्ये किनाऱ्याकडून समुद्रात जाताना दिसत आहे. ही नाव वेगाने लाटा कापत पुढे जाताना दिसत आहे. यानंतर अचानक आलेल्या लाटेत नाव उलटते.

शहारा आणणारा व्हिडिओ - व्हिडिओमध्ये दिसत आहे की, समुद्राच्या लाटेत नाव बुडते. यामुळे सर्वच पर्टक समुद्रात पडतात. यावेळी सर्वच लोक सुद्रातून पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हडिओपासून सर्वच युजर्सच्या अंगावर शहारा उभा राहत आहे. तसेच समुद्रात अशा पद्धतीचे खेळ खेळणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचेही अनेक युजर्सनी म्हटले आहे. आतापर्यंत हजारोवेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWaterपाणी