शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

UP मधील 'बेवफा चाय वाला' ज्यांना प्रेमात धोका मिळाला त्यांना चहा स्वस्त; प्रेमी युगुलांसाठी 5 रूपये जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 12:09 IST

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे तरूणाने चहाचे अनोखे दुकान टाकले आहे.

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे तरूणाने चहाचे अनोखे दुकान टाकले आहे. हे अनोखे दुकान सध्या खूप चर्चेत असून त्यामागील कारण देखील खास आहे. खरं तर प्रेमात धोका मिळणाऱ्यांसाठी या दुकानात स्वस्त चहा मिळणार आहे. तर बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत गेल्यास अतिरिक्त दर आकारला जाईल, असे दुकानाच्या फलकावर लिहण्यात आले आहे. जोडप्यांना महागड्या चहासोबत कडू सल्लाही अनुभवायला मिळणार आहे. डिप्रेशनमुळे चहा विकणाऱ्या या चहाच्या स्टॉलच्या मालकाची कहाणी खूप अनोखी आहे.

मुरादाबादच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील हरथाळा सोनकपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या अख्तरने हरताळा येथे आपला स्टॉल सुूरू केला आहे. चहा प्यायल्याबरोबर शरीरात ऊर्जा आणि ताजेपणाची हमी देणारा या स्टॉलचा मालक 40 वर्षीय आहे. हे दुकान सुरू करण्यामागे लॉकडाऊन हे खरे कारण असल्याचे अख्तर सांगतो. याशिवाय तो डिप्रेशनमध्ये होता त्यामुळे लोकांना हसवता यावे यासाठी आपण दुकानाला हे अनोखे नाव दिले आहे असेही त्याने सांगितले. 

कसा सुरू झाला चहाचा स्टॉल?अख्तरने वृत्तवाहिनी न्यूज 18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता. लॉकडाऊनमध्ये लोकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे त्यानेही टॅक्सी चालवणे बंद केले होते. मग काहीतरी वेगळं का करू नये असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने घरी चहाचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. अखेर त्याने लवंग, वेलची, केशर, तुळस, घालून एक काढा बनवला, जो अतिशय चवदार होता. मग लॉकडाऊननंतर त्याने हरताळा येथे दुकान उघडले आणि त्या दुकानाचे नाव बेवफा चायवाला असे ठेवले.

कपल्ससाठी वेगळा दरबेवफा चायचा मालक अख्तरने प्रेमात धोका मिळणाऱ्या लोकांना 10 रूपयांत चहा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रेमी युगुलांसाठी चहाची किंमत 15 रुपये आहे. कोणी कोणाचे नसते, कोणावर जास्त विश्वास ठेवू नका, अशी भावना असल्यामुळे प्रेमी युगुलांसाठी 5 रुपयांचा महागडा चहा देत असल्याचे अख्तर सांगतो. त्याच्या दुकानात येणाऱ्या जोडप्यांनाही तो याबाबत समजावून सांगतो.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशmoradabad-pcमोरादाबाद