शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रशियन मुलीशी लग्न करून अचानक घरी पोहचला १९ वर्षीय मुलगा; त्यानंतर जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 08:24 IST

अनमोल अचानक अलोनाला घेऊन त्याच्या घरी जातो. घरचा दरवाजा उघडल्यानंतर आई समोर असते.

नवी दिल्ली - घरातल्या मुलानं किंवा मुलीने तुम्हाला न सांगता परस्पर लग्न करून जर घरी आले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सध्या यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत हाच प्रकार पाहायला मिळाला आहे. ज्यात एका १९ वर्षाच्या मुलानं अचानक रशियन मुलीला बायको बनवून घरी आणलं. हे पाहून आई संतापली. तू मूर्ख आहेस, असं कुणी लग्न करून घरी येते का? असं ओरडत आईनं मुलाला फटकारलं. हा व्हिडिओ सोशल मीडियात सगळीकडे व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत यूट्यूबर अनमोल वर्मा त्याची मैत्रिण इवा आणि रशियन मुलगी अलोनासह दिसतो. अनमोलने घरी कॅमेरा सेटअप केलेला असतो. जेणेकरून घरच्यांचे रिअल टाइम एक्सप्रेशन रेकॉर्ड करता येईल. त्याचवेळी अनमोल अलोनाच्या गळ्यात हार घालतो. स्वत:ही हार घालून अलोनाच्या गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्यात सिंदूर भरतो. हे लग्न खरे वाटावे असं अनमोल करतो. 

त्यानंतर अनमोल अचानक अलोनाला घेऊन त्याच्या घरी जातो. घरचा दरवाजा उघडल्यानंतर आई समोर असते. अनमोल म्हणतो की, मी या मुलीशी लग्न केलंय. आजपासून अलोना आपल्यासोबत राहील. तिची बॅगही त्याच्याबरोबर असते. अचानक मुलगा लग्न करून घरी आलेला पाहून आईला धक्का बसतो. आई संतापून म्हणते. तुला अक्कल आहे का? २ मिनिटे आत ये आणि हा कॅमेरा बंद कर. अनमोलची आई घडलेला प्रकार पाहून हैराण असते. घरात येऊन बोल, बाहेर तमाशा करू नको असं ती म्हणते. 

मुलगा यूट्यूबवर व्हिडिओ बनवतोय हे पाहून आईला कुठेतरी प्रँक व्हिडिओ असल्याचा संशय येतो. तेव्हा अनमोल सांगतो की माझ्याकडे लग्नाचे डॉक्युमेंट्स आहेत. मी कोर्टात लग्न केले हे सांगत त्याने मैत्रिण इवाला कागदपत्रे दाखवण्यास म्हणतो. अनमोलची मैत्रिण इवा ही त्याच्या आईला या दोघांचे लग्न झालंय हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. साक्षीदार म्हणून कोर्टात लग्नाच्या प्रमाणपत्रावर तिची सही असल्याचेही सांगते. अनमोलच्या आईचा या दोघांच्या लग्नावर विश्वास बसतो. त्यानंतर आई अनमोलला खूप ओरडते. ही जबाबदारी कशी उचलणार? अलोनाला विचारते. तू तुझ्या आई वडिलांना लग्नाबाबत सांगितलंय का? असा प्रश्नांचा भडीमार अनमोलची आई करते. 

...अन् अखेर येतो ट्विस्टव्हिडिओच्या शेवटी अनमोल आईला सांगतो हा प्रॅंक व्हिडिओ आहे. तेव्हा हे ऐकून आई त्याला मारायला लागते. हे सर्व पाहून अलोना आणि इवा जोरजोरात हसतात. या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत ४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर यूझर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.