Video : वाह क्या बात है! 'या' चिमुरडीची तुफान बॅटींग पाहून, तुम्ही सगळे शॉट्स विसराल....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:20 PM2020-04-22T17:20:15+5:302020-04-22T17:30:08+5:30

या मुलीचं वय फक्त ७ वर्ष आहे. पण क्रिकेट खेळताना मात्र एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे खेळत आहे.

7 year old kid pari sharma playing cricket will win your heart myb | Video : वाह क्या बात है! 'या' चिमुरडीची तुफान बॅटींग पाहून, तुम्ही सगळे शॉट्स विसराल....

Video : वाह क्या बात है! 'या' चिमुरडीची तुफान बॅटींग पाहून, तुम्ही सगळे शॉट्स विसराल....

Next

तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल किंवा नसाल तरी या मुलीचा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. सध्या सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडीयावर लहान मुलांचे नवनवीन कौशल्य आपल्याला पाहायला मिळत असतं. असाच हा व्हिडीओ सुद्धा या चिमुरडीच्या कौशल्याची ओळख करून  देणारा आहे.

या व्हिडीओत एक मुलगी ज्याप्रमाणे बॅटींग करत आहे. ते पाहून क्रिकेटप्रेमी नक्की खूश होतील. या मुलीचं वय फक्त ७ वर्ष आहे. पण क्रिकेट खेळताना मात्र एखाद्या अनुभवी आणि मोठ्या खेळाडूप्रमाणे खेळत आहे. या मुलीचं नाव परी शर्मा आहे. परीला मोठं होऊन क्रिकेटपटू व्हायचं आहे. ( हे पण वाचा-Viral Video : कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर इंटरनेटवरील लोक झाले फिदा, 50 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ...)

त्यासाठी ही मुलगी आत्तापासून प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावरील फोटोमध्ये परीने आपल्या कुटुंबाचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. तसंच वेगवेगळे व्यायामप्रकार करतानाचा व्हिडीओ परिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ( हे पण वाचा-Video : लॉकडाऊनमुळे वैतागलेली बाई; रस्त्यावर दिसला कोरोना मग काय, चोप चोप चोपला...)

Web Title: 7 year old kid pari sharma playing cricket will win your heart myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.