शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बापाचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६ वर्षाचा मुलगा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत, त्याची मेहनत पाहून प्रेक्षकही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:39 IST

Viral News : स्टेजवर जेव्हा ६ वर्षीय रचित पांचाळ आत्मविश्वासाने पोज देताना दिसला, तर पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 

Viral News : सध्या सोशल मीडियावर एका ६ वर्षीय बॉडी बिल्डरचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. मुंबईत आयोजित ज्युनिअर मुंबई श्री २०२६ स्पर्धेत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे ही स्पर्धा यावेळी चांगलीच चर्चा आहे. या मुलाची भावूक करणारी कहाणी लोकांना मनाला भिडत आहे. स्टेजवर जेव्हा ६ वर्षीय पंचित पांचाळ आत्मविश्वासाने पोज देताना दिसला, तर पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 

रचितची कहाणी संघर्ष आणि मेहनतीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. २०२४ मध्ये एका अपघातामुळे त्याच्या बॉडीबिल्डर वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं. अशात परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण वडिलांचं स्वप्न इथेच संपलं नाही. त्यांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करत रचितने कमी वयातच बॉडीबिल्डींगच्या विश्वात पाऊल ठेवलं.

ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशनद्वारे आयोजित या स्पर्धेत ५५ किलो वजन वयोगट आणि २३ वर्षापेक्षा कमी वयोगटात रचितच्या सहभागाने सगळ्यांना अवाक् केलं. त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांसमोर त्याने ज्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने स्टेजवर सादरीकरण केलं ते बघून सगळेच थक्क झाले. 

स्पर्धेदरम्यान रचितने वेगवेगळ्या पोज देऊन आपली तयारी आणि मेहनतीचा परिचय दिला. अर्थात प्रेक्षकांसाठी हा नजारा भावूक करणारा होता. यावेळी त्याच्या आईचे डोळे पाणावले होते. त्या म्हणाल्या की, मुलाचं हे सादरीकरण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक सुरूवातीचं पाऊल आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही तर हिंमत, परिवार आणि स्वप्नांची कहाणी आहे. ६ वर्षाचा हा खेळाडू सध्या मुंबई स्पिरिटची ओळख ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 6-Year-Old Bodybuilder Fulfills Father's Dream, Wows Audience in Competition

Web Summary : Six-year-old Rachit Panchal impressed at the Junior Mumbai Shree 2026 competition, fulfilling his late bodybuilder father's dream. Despite his young age, his confident performance moved the audience, showcasing his dedication and family's support. He competed in the 55 kg category.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMumbaiमुंबई