South Korea Bridge Collaps: निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे किंवा आपत्तींमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना जगभरात घडत असतात. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी देखील होते. असाच काहीसा प्रकार दक्षिण कोरियात समोर आला आहे. दक्षिण कोरियात एक भलामोठा पूल पत्त्यासारखा कोसळला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल असून काहीजण जखमी झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
दक्षिण कोरियातील भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूल कोसळल्याचा धक्कादायक अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दक्षिण कोरियामध्ये एक्स्प्रेस वेच्या बांधकामाच्या ठिकाणी ही पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. सोलपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेओनान शहरात हा अपघात झाल्याची माहिती तिथल्या प्रशासनाने दिली आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पूल कोसळल्यानंतर आकाशात धूळीचे साम्राज्य निर्माण झालं होतं. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिघे अद्यापही बेपत्ता आहेत. हायवे ब्रिजला आधार देणारी पाच ५० मीटर स्टीलची संरचना क्रेनने बसवल्यानंतर एकामागून एक कोसळली.
गाडीमधून शूट केलेल्या व्हिडिओमध्ये पुलाचा एक भाग अचानक कसा कोसळला. मात्र, हा पूल कसा कोसळला आणि या अपघातात किती लोक जखमी झाले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र दुर्घटनेत अनेक कामगार अडकून पडल्याचे बोलले जात आहे.
या अपघातानंतर कार्यवाहक अध्यक्ष चोई संग मोक यांनी तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले. सोलच्या कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत अशा अपघातांमध्ये ८ हजारांहून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. महामार्गाचा काही भाग कोसळण्याचे कारण समजू शकले नसल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटलं.