शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मी जातोय मला सभाळून घे म्हणत युवकाची आत्महत्या

By अनंत खं.जाधव | Updated: December 18, 2023 19:50 IST

मित्राला मोबाईल संदेश: कारण अस्पष्ट

सावंतवाडी : मी जातोय मला सभाळून घे असा मोबाईल संदेश मित्राला पाठवत सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथील साहिल सुनिल राऊळ (22) या युवकाने माजगाव येथील मित्रांच्या भाड्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेने शिरशिंगे गावात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पर्यत स्पष्ट होऊ शकले नाही.

शिरशिंगे वीरवाडी येथील साहिल राऊळ हा आयटीआय झाला होता.त्याने आलिकडेच माजगाव येथील कंपनीत काम शोधले होते.त्या कामावर मागील काहि दिवसापासून  येत होता. सकाळच्या सत्रात कंपनीत तर सायंकाळी सावंतवाडी शहरातील एका हाॅटेल मध्ये तो काम करत होता.आणि  माजगाव येथे आपल्या मित्राच्या घरी राहत होता.

सोमवार असल्याने माजगाव येथील कंपनी ला सुट्टी असते त्यामुळे तो एरव्ही आपल्या शिरशिंगे या आपल्या गावी जातो पण आज गावी न जाता खोलीवरच थांबला सकाळी आंघोळ केली नंतर बाजारात ही जाऊन आला त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याने अचानक आपल्या मित्राला मोबाईल वर संदेश पाठवला यात मला जमत नाही सभाळून घे मला स्टेशन आले असे लिहून मोबाईल स्वीच ऑफ केला.या मोबाईल संदेशा नंतर लागलीच त्याचे मित्र माजगाव येथील खोलीवर गेले तर दरवाजा बाहेरून बंद होता तसेच साहिल आतून आवाज देत नव्हता.

त्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आले व दरवाजा उघडण्यात आला पण तत्पूर्वीच साहिल याने गळफास घेत आपले जीवन संपवले होते.या घटनेनंतर त्याच्या मित्राना अश्रू अनावर झाले या घटनेची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटूंबाला दिली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच शिरशिंगे गावातील अनेक ग्रामस्थ रूग्णालयात परिसरात दाखल झाले.त्यानंतर उशिरा मृतदेह शिरशिंगे गावी नेण्यात आला या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.मृत साहिल याच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे.शिरशिंगे चे माजी सरपंच नारायण राऊळ यांचा तो पुतण्या होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग