शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी युवकांनी एकत्र यायला हवे, रानमाणूस प्रसाद गावडे यांनी केले आवाहन 

By अनंत खं.जाधव | Updated: May 2, 2024 12:50 IST

सावंतवाडीत शाश्वत कोकणवर चर्चासत्र 

सावंतवाडी : आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे. कोकणात येणारे विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी युवकांनी एकत्र यायला हवे. कोकणाला बुद्धिमत्तेचा, विचारांचा वारसा लाभला असून त्याचा उपयोग करा असे आवाहन कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसाद गावडे यांनी केले. सावंतवाडी येथे शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण अभ्यासक सत्यजित चव्हाण, मल्हार इंदुलकर, मंगेश चव्हाण, शशी सोनावणे, आदी उपस्थित होते.गावडे म्हणाले, कोकणातल्या युवकांची बुद्धिमत्ता प्रचंड आहे. परंतु आजचा युवक जेव्हा राजकारण्यांच्या मागे धावत आपला वेळ वाया घालवताना दिसतो तेव्हा वाईट वाटते. संघर्षाकडून समृद्धीकडे ही टॅगलाईन वापरून शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन करण्यात आल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. कोकणचे कोकण पण टिकावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकण हे जगातील आजच्या घडीचं जगण्यासाठी चांगले ठिकाण आहे. केवळ आजी आजोबांचे कोकण आपल्याला ठेवायचं नाही. शेवटची पिढी ही सहानुभूती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जी तरुण पिढी आता आहे तीच नवी पिढी आहे. शेवटच्या पिढीतील जीवनशैली आपल्याला स्वतःमध्ये उतरविली तरच शाश्वततेकडे जाऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. आपण फक्त माझा मी शाश्वत जगतो या मानसिकतेत राहता काम नये. आपल्या आजूबाजूचे कोकण जोपर्यंत उध्वस्त होत आहे तोपर्यंत आपण शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही . त्यासाठी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या देवराई जपल्या गेल्या पाहिजेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.कोकणामध्ये येणारे जे विनाशकारी प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच कोकणची लोक संस्कृती, जीवनशैली बाबत जनजागृती करणारे कार्यक्रम भविष्यात या माध्यमातून राबवले जातील असा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. या निमित्ताने शाश्वत कोकण चा विकास यावर मंगेश चव्हाण ,शशी सोनावणे यांनी ही आपले विचार व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग