शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पोलिसांचा खबऱ्या असल्याची बतावणी करणाऱ्या युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:13 IST

पोलिसांचा खबऱ्या आहे अशी बतावणी करुन पानाची टपरी चालविणाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवकाचे नाव इजाज दिलावर शेख (28, रा.कोल्हापुर , राजारामपुरी ) असून ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

ठळक मुद्देपोलिसांचा खबऱ्या असल्याची बतावणी करणाऱ्या युवकाला अटकयुवक कोल्हापुरचा, कणकवलीतच घेतले ताब्यात

कणकवली : पोलिसांचा खबऱ्या आहे अशी बतावणी करुन पानाची टपरी चालविणाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्या युवकाचे नाव इजाज दिलावर शेख (28, रा.कोल्हापुर , राजारामपुरी ) असून ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती.कणकवली गांगोमंदिर शेजारी दीपक शंकर बागवे( रा. कणकवली , टेंबवाड़ी ) याची पानाची टपरी आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक युवक त्या पानाच्या टपरिवर आला. त्याने तिथे सिगारेट घेतली. त्यानंतर पानाच्या टपरीचा मोबाईल मध्ये फोटो काढला.

टपरी चालक दीपक बागवे याला तू मटका जुगारावर पैसे घेतोस अशी माहिती मला मिळाली आहे. मी पोलिसांचा खबऱ्या आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे आमचे साहेब जानवली पुलाच्या पलीकडे थांबले आहेत . त्याना भेटूया असे सांगितले. त्याच्याजवळ नंबर नसलेली अक्टिव्हा गाडी होती.त्यावर बसवून त्याने दीपक बागवे याला जानवली पुला पलीकडे नेले.तिथे गेल्यावर बागवे यांने त्याला साहेब कुठे आहेत ?असे विचारले . तर साहेब पुढे गेले आहेत.ते येतील असे सांगितले. तू मटका घेतोस . तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल .असे सांगत यातून बाहेर पडायचे असेल तर 10 हजार 500 रूपये दे अशी मागणी केली.बागवे याने आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे 5 हजार 500 रूपये देण्याचे ठरले. घाबरलेल्या बागवे याने आपल्या मेहुण्याला फोन करून पैसे आणण्यास सांगितले. तसेच इजाज शेख याला पैसे दिले. शेख तिथून निघून गेला.त्यानंतर बागवे याने आपल्या काही मित्रांना या घटनेबाबत सांगितले. त्यांनी अशी कोणी व्यक्ति नसल्याचे त्याला सांगितले.तसेच त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो सापडला नाही. बुधवारी सकाळी बागवे याने कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एस.ओतवणेकर यांनी तपास सूत्रे हलविली.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलिस प्रकाश गवस, दिलीप पाटील यानी जोरदार शोध मोहिम राबवून दीपक बागवे याने सांगीतलेल्या वर्णनाच्या व्यक्तीला कणकवलीतच ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याची सांगणारी तीच व्यक्ति असल्याचे स्पष्ट झाल्याने इजाज शेख याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग