शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू : कारिवडेत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:06 IST

कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) हा युवक शिकारीसाठी गेला असताना त्याच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन हाताला जखम झाली. तसेच बंदुकीच्या आतील छर्रे शरीराला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्दे बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू : कारिवडेत खळबळशिकारीसाठी गेला असताना दुर्घटना, सावंतवाडी पोलीस करणार तपास

सावंतवाडी : कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) हा युवक शिकारीसाठी गेला असताना त्याच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन हाताला जखम झाली. तसेच बंदुकीच्या आतील छर्रे शरीराला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे.शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास बंदूक घेऊन तो घरातून शिकारीसाठी निघून गेला होता. मात्र, काही वेळातच तो पुन्हा घरी आला. तेव्हा त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. त्याने आपल्या घरात येऊन भावाला लगेच रुग्णालयात चल असे सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने त्याचा भाऊ एकनाथ हा रुग्णालयात घेऊन आला. त्याला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.या घटनेने कारिवडे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्याच्या भावाच्या माहितीनुसार तक्रार दाखल करून घेतली असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस हेडकॉन्स्टेबल लोहकरे करीत आहेत.एकटाच शिकारीला जाण्याची सवयअभिजीत याच्या शरीरावरही बंदुकीचा स्फोट झाला. बंदुकीचे छर्रे उडाल्याने त्याला जखमा झाला. याबाबत मृत अभिजीतचा भाऊ एकनाथने पोलिसांना माहिती दिली. यात आपल्या भावाला शिकारीस जाण्याची सवय होती.तो एकटाच शिकारीला जात असे. तसा तो शनिवारीही गेला होता. मात्र, काही वेळातच पुन्हा तो घरी आला. तेव्हा त्याने बंदुकीचा स्फोट झाल्याचे आम्हांला सांगितले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, असे त्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग