शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अस्वलाच्या हल्ल्यात युवक गंभीर, मांगेली तळेवाडी येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 19, 2024 18:33 IST

शिकाऱ्याचीच शिकार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा

वैभव साळकरदोडामार्ग : मांगेली तळेवाडी येथे मंगळवारी रात्री अस्वलाने केलेल्या हल्ल्यात सुरेश अर्जुन गवस (३२) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा हात जायबंदी झाला तर डोक्याला व तोंडालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर बांबोळी गोवा येथे सध्या उपचार सुरू आहेत. अस्वलाने हल्ला केल्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ असून, त्यामुळे मांगेली परिसरात खळबळ उडाली आहे.दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्ती, गवे यांच्या हल्ल्यात यापूर्वी अनेकदा शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता अस्वलांचादेखील तालुक्यात शिरकाव झाला आहे. मांगेली गावच्या वेशीला लागूनच कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते. त्याला लागूनच सडा, चोरले, मान आदी गावांच्या सीमा आहेत. या ठिकाणी घनदाट जंगल आहे जे कर्नाटक वनविभागाच्या अखत्यारीत येते. याच घनदाट जंगलात अस्वलांचे अस्तित्व आहे. तेथूनच हे अस्वल खाली मांगेली गावात उतरले असल्याची शक्यता आहे.

सुरेश गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रात्रौ आपल्या काजूकलमांच्या बागेची राखण करण्यासाठी गेले होते. गवे येत असल्याने त्यांना हाकलण्यासाठी आपण गेलो होतो आणि याचदरम्यान अस्वलाने आपल्यावर हल्ला चढविला. मात्र, आपण हल्ल्याला निकराचा प्रतिकार केल्याने अस्वलाने जंगलात पळ काढला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण बचावलो, असे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली असून, काजूचा हंगाम नसताना रात्रीच्या वेळी बागेत जाण्याचे कारण काय? यापाठीमागे शिकार किंवा अन्य काही कारण आहे का? यादृष्टीनेही वनविभागाचे अधिकारी तपास करणार असून, त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

शिकाऱ्याचीच झाली शिकार?मांगेलीत घडलेली ही घटना म्हणजे जंगलात गेलेल्या शिकाऱ्याचीच शिकार होण्याचा प्रकार असल्याची चर्चा मांगेलीतच दबक्या आवाजात सुरू आहे. मांगेलीत मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांची शिकार होते. अनेकदा शिकारीचे प्रकार उघडही झाले आहेत. काहींचा तर तो एक धंदाच बनला आहे. काही स्थनिकांचाही त्यात सहभाग असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे या अस्वल हल्ल्यामागे शिकारीची पार्श्वभूमी तर नाही ना? आणि अस्वलाने हल्ला केला तेव्हा गवस यांच्यासोबत आणखीन कोणी होते का? या अनुषंगाने हे वनाधिकारी तपास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल